![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Prakash Mahajan on Jitendra Awhad: देशाच्या प्रत्येक संसाधनावर, शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा; मनसे नेते प्रकाश महाजनांचे आव्हाडांना प्रत्युत्तर
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून मनसे नेते प्रकाश महाजन यांचे राष्ट्रवादीचे नेत जितेंद्र आव्हाड यांना प्रत्युत्तर
![Prakash Mahajan on Jitendra Awhad: देशाच्या प्रत्येक संसाधनावर, शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा; मनसे नेते प्रकाश महाजनांचे आव्हाडांना प्रत्युत्तर Prakash Mahajan on Jitendra Awhad that hindus have greater share in every govt scheme Nashik News Prakash Mahajan on Jitendra Awhad: देशाच्या प्रत्येक संसाधनावर, शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा; मनसे नेते प्रकाश महाजनांचे आव्हाडांना प्रत्युत्तर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/04/65815b82e33c29b054885e647c1688a917200947532991063_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Nashik News: या देशाच्या प्रत्येक संसाधनावर व शासकीय योजनेवर हिंदूंचा अधिक वाटा असला पाहिजे अशी प्रतिक्रिया मनसे नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी नाशिकमधील मालेगावात दिली. आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी बुधवारी महाजन यांना मुस्लिम देश का? असा सवाल केला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना महाजन यांनी हे भाष्य केले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील काही त्रुटी मी दाखवल्या यात मुस्लिम द्वेष कुठे आला? भारतीय सैन्यात, पोलीस दलात सर्वाधिक हिंदूच आहेत..जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या मतावर निवडून येत असल्यामुळे त्यांच्या नसा नसात हिंदू द्वेष भरल्याचेही महाजन यांनी सांगितले.
लाडकी बहीण योजनेचा मुस्लीमांना लाभ नको- मनसे नेते प्रकाश महाजनांची मागणी
ज्या समाजामध्ये दोन बायका,दोनपेक्षा जास्त आपत्य आहेत अशा मुस्लीम धर्मातल्या लाेकांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळता कामा नये असे बुधवारी मनसे नेते प्रकाश महाजनांनी वक्तव्य केले होते. डोमेसाईलची अट काढल्यास बांग्लादेशीही या योजनेचा फायदा घेतील असे ते म्हणाले होते. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाडांनी इतका मुस्लिमांचा द्वेष का? असा सवाल प्रकाश महाजनांना केला होता. यावर महाजनांनी प्रत्युत्तर दिले आहे.
हेही वाचा:
बँकेत नवं खातं उघडू नका, अफवांवर विश्वास नको; लाडक्या बहिणींना जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)