एक्स्प्लोर
Advertisement
सावरकर म्हणजे एक माणूस पण दोन चेहरे, सावरकरांना 'भारतरत्न' देण्यास प्रकाश आंबेडकरांचा विरोध
देश पारतंत्र्यात होता तोपर्यंत सावरकर हे क्रांतिकारक होते याबद्दल दुमत नाही. त्या काळात ते 'हिरो'च होते. मात्र त्यांचा हिंदू महासभेचा दुसरा कालखंड तपासला पाहिजे, असेही ते म्हणाले.
सोलापूर : सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणे चुकीचे आहे. सावरकर म्हणजे एक माणूस पण दोन चेहरे आहेत, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी सावरकरांना भारतरत्न देण्यास विरोध केला आहे. ते सोलापुरात आयोजित सभेत बोलत होते.
ब्रिटिशांविरोधात बंडखोरी करणाऱ्या पत्री सरकारला पकडून देण्याचे काम सावरकरांच्या हिंदू महासभेने केले होते. सावरकरांनी आपल्या संघटनेतील कार्यकर्त्याला हे करु नका असे कधी सांगितले नाही. अंदमानातून यातना भोगून आलेल्या या क्रांतिकारकाने पत्री सरकारमधील क्रांतिकारकांना त्याच यातना भोगायला लावल्या, असा आरोप देखील आंबेडकरांनी केला आहे. त्यामुळे सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
देश पारतंत्र्यात होता तोपर्यंत सावरकर हे क्रांतिकारक होते याबद्दल दुमत नाही. त्या काळात ते 'हिरो'च होते. मात्र त्यांचा हिंदू महासभेचा दुसरा कालखंड तपासला पाहिजे, असेही ते म्हणाले.
भारतीय अर्थव्यवस्था आणि बॅंकांच्या स्थितीवर बोलताना आंबेडकर म्हणाले की, इथल्या बॅंका बुडणार आहेत. इथल्या बॅंकांचा वाईट काळ संपलेला नाही. NPA ची व्याप्ती 72 टक्क्यांवरुन 76 टक्क्यांवर गेलीय. मग बॅंकांचा वाईट काळ संपला असे कसे म्हणता? असा सवाल त्यांनी केला. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून 33 हजार कुटुंब भारत सोडून गेले आहेत. आम्हाला सत्ता दिल्यास या सर्व कुटुंबाची लिस्ट देतो. उधळलेल्या घोड्याला लगाम घालण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला मत द्या, असेही ते म्हणाले.
2014 आणि 2019 ला मुस्लिम बांधवांनी कॉंग्रेसला मतदान केले. कॉंग्रेस पक्ष भाजपला हरवू शकत नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला सत्ता द्या, असेही ते म्हणाले.
हे ही वाचा - सावरकरांना भारतरत्न हा भगत सिंहांचा अपमान : कन्हैया कुमार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
राजकारण
राजकारण
Advertisement