एक्स्प्लोर

मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे रुपयामध्ये मोठी घसरण | प्रकाश आंबेडकर

भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकास्र सोडलं.

मुंबई | भाजप सरकारने देशावर 1990 सालासारखं आर्थिक संकट आणलं आहे, असा दावा करत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. भाजपा सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे रुपयामध्ये मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे, अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीकास्र सोडलं. बेरोजगारी, रुपयाचं अवमूल्यन आणि आर्थिक असमानता याबाबत त्यांनी मोदी सरकारच्या धोरणाला जबाबदार धरलं.  दरम्यान, वंचित आघाडी ही भाजपची बी टीम आहे का, या आरोपांवर मात्र त्यांनी न बोलणंच पसंत केलं. देशातील एकूण संपत्तीच्या 50 टक्केपेक्षा जास्त संपत्ती ही जवळपास 3 लाख कुटुंबांकडे आहे. रुपया घसरण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे भाजपकडून उद्योगपतींचा छळ होत आहे. काही जणांची माहिती इतरांना दिली जाते, त्यांना ब्लॅकमेल केलं जातं, असा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेली कुटुंबं स्थलांतर करत आहेत, आपली संपत्ती विकत आहेत. रुपये डॉलरमध्ये बदलून भारतातून पलायन करतोय. आयातही होत नाही आणि निर्यातही अशी सध्याची परिस्थिती आहे अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. एइडीआयमध्ये येणारा पैसाही बंद झाला आहे. देशातील 50 हजार कोटी रुपये डॉलरमध्ये रुपांतरित केले जाऊ शकतात. तसं झालं तर डॉलरची किंमत 100 रुपयांपर्यंत जाऊ शकते, असंही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे. तसंच या सगळ्याला भाजप सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. महाआघाडी आम्ही वेगळी आघाडी केलेली नाही, काँग्रेसला मी कधीपासून आघाडीसाठी विचारतोय पण तेच चर्चेला येत नाहीत असं प्रकाश आंबेडकरांनी महाआघाडीबाबत बोलताना स्पष्ट केलं. पवारांसोबत आघाडीचा निर्णय काँग्रेसने घ्यावा राफेलबाबत राहुल गांधी यांनी चोरी झाली असं म्हटलं होतं. शरद पवारांनी राहुल गांधींना खोटं ठरवलं. आता काँग्रेसने ठरवावं, पवारांबरोबर आघाडी करायची की नाही अशा शब्दात पवारांवरही निशाणा साधला. तसंच काँग्रेसच्या जागी मी असतो तर अशा स्थितीत आघाडी केली नसती असंही स्पष्ट केलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prataprao Jadhav On Buldhana Hair Fall : केस गळतीच्या संख्येत वाढ, आरोग्य पथ बोंडगावात दाखलABP Majha Headlines | 7 AM | एबीपी माझा हेडलाईन्स | 11 Jan 2025 | Maharashtra Politics | ABP MajhaABP Majha Headlines | एबीपी माझा हेडलाईन्स | 6.30 AM | 11 Jan 2025 | ABP MajhaSharad Pawar on Jayant Patil | पवारांच्या राष्ट्रवादीत जयंत पाटलांविरोधात झेंडा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणीत वाढ, शेतकरी आंदोलनाविरोधातील वक्तव्य भोवण्याची शक्यता
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
शेतकऱ्याची धावपटू मुलगी घेणार गरुडभरारी, मुख्यमंत्र्यांनी घेतली जबाबादारी, पुण्याच्या बालेवाडीत मिळणार प्रशिक्षण
Horoscope Today 11 January 2025 : आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
आजचा शनिवार सर्व 12 राशींसाठी खास; कसा असणार तुमचा दिवस? वाचा आजचे राशीभविष्य
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण?  बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Video: एकनाथ शिंदे की अजित पवार, विश्वासू कोण? बेधडक मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं बिनधास्त उत्तर
Torres Scam : 300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील अनेक गोष्टी समोर, आरोपीच्या घरातून 77 लाख जप्त
300 रुपयांचे खडे डायमंड म्हणून 50 हजार रुपयांना विकले, टोरेस घोटाळ्यातील धक्कादायक गोष्टी, आरोपीच्या घरात 77 लाख सापडले
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Embed widget