कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा एकदा आयपीएलवरून पोस्टर वॉर! राधानगरीत चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स
काही दिवसांपूर्वी आयपीएल मधील संघावरुन कोल्हापूरमध्ये पोस्टर वार रंगलं होतं. आता पुन्हा अशाच प्रकारे चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचे समर्थक राधानगरीत आमने-सामने आले आहेत.
कोल्हापूर : आयपीएल 2020 हंगाम 13 नुकताच सुरू झाला आहे. हंगामातील पहिला सलामीच्या सामन्यात मुंबई इंडियन्स पराभूत झाले. तोच गावागावात खेळाडू आणि टीम वाटून घेण्याचे प्रकार वाढलेत. यातून गट-तट आणि एकमेकांविरोधातील इर्षा शिगेला पोहचतीय. कोल्हापूर जिल्ह्यात आयपीएलच्या आधी एक असाच प्रकार घडला होता. आता प्रत्यक्ष आयपीएल सुरू झाल्यावर देखील तसाच प्रकार पाहायला मिळतो.
कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी मधल्या मार्केट चौकात दोन होर्डिंग्ज लागले आहेत. या होर्डिंग्जकडे पाहिल्यानंतर आणि त्याच्यावरच मजकूर वाचल्यावर दोन टीम मधल्या समर्थकात किती खुन्नस भरलीय हे लक्षात येतं. मुंबई इंडियन्सने होर्डिंग्ज लावले आहे अगदी त्याच्या बाजूलाच चेन्नई सुपर किंगच्या टीमचं होर्डिंग्ज लावलं आहे. दोन्ही होर्डिंग्जवर फक्त महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचेच फोटो आहेत.
या दोन्ही होर्डिंग्जवर नेमका मजकूर काय आहे?
मुंबई इंडियन्सच्या पोस्टरवर 'जल मत बराबरी कर'. 'नावातच दहशत' त्याच बरोबर 'आण्णा म्हणत्यात सलाम ठोकत्यात' असा मजकूर तर चेन्नई सुपर किंग्जच्या पोस्टरवर 'धोनी साहेब' आणि 'आण्णा गेले बंबात' असा मजुकर आहे. यावरून दोन्ही समर्थकांमधील इर्षा लक्षात येते.
वीरेंद्र सेहवागने कान टोचले होते! काही महिन्यापूर्वीच कोल्हापुरात असाच प्रकार घडला होता. पोस्टर वॉर वरून दोन गट आमने सामने आले होते. त्यावेळी भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवागने चाहत्यांचे कान टोचले होते. त्यामुळे आयपीएलमुळे ग्रामीण भागात गट-तट पडत आहेत असंच दिसतंय. मित्रांनो धोनी काय आणि शर्मा काय हे सगळे खेळाडू आपलेच आहेत. त्यामुळे तुमच्यातले गट-तट मैदानावरच ठेवा, वैयक्तिक पातळीला घेऊन जाऊ नका.
महत्वाच्या बातम्या :
IPL 2020, DCvKXIP : दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, 'हा' स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त
IPL 2020, DCvKXIP Preview: आयपीएलच्या मैदानात आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब आमनेसामने