एक्स्प्लोर

IPL 2020, DCvKXIP Preview: आयपीएलच्या मैदानात आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब आमनेसामने

Delhi Capitals (DC) Vs Kings XI Punjab (KXIP) Where to Watch Match IPL 2020 Match Preview: आयपीएलच्या मैदानात दिल्ली आणि पंजाब हे दोन्ही संघ आजवर 24 वेळा आमनेसामने आले आहेत त्यात 14 वेळा पंजाबनं तर 10 वेळा दिल्लीनं बाजी मारली आहे.

IPL 2020 DCvKXIP : आयपीएलच्या मैदानात आज श्रेयस अय्यरची दिल्ली कॅपिटल आणि लोकेश राहुलच्या किंग्स इलेव्हनमध्ये सामना रंगणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवण्यात येईल. दिल्लीच्या संघात मुंबईकर खेळाडूंचा भरणा जास्त आहे. कर्णधार श्रेयस अय्यर, सलामीवीर पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे या तिघा मुंबईकर खेळाडूंवर दिल्लीची भिस्त राहिल. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्लीच्या संघानं यंदा कसून सराव केला आहे.

रहाणेचा नंबर कोणता?

गेले काही मोसम राजस्थानकडून खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेला यंदाच्या मोसमासाठी दिल्लीनं करारबद्ध केलं आहे. पण दिल्लीची फलंदाजांची खोली पाहता आता रहाणेला कोणत्या क्रमांकावर खेळवणार हा संघव्यवस्थापनासमोरचा मोठा प्रश्न आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन सलामीला येतील. तिसऱ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर, त्यानंतर रिषभ पंत, शिमरॉन हेटमायर अशी भक्कम फळी दिल्लीकडे आहे. यात अजिंक्य रहाणेला कोणत्या क्रमांकावर फलंदाजीला धाडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

लोकेश राहुलच्या नेतृत्वात पंजाब सज्ज

लोकेश राहुलच्या रुपात यंदा किंग्स इलेव्हन पंजाबला नवं नेतृत्व मिळालं आहे. त्याचबरोबर प्रशिक्षकपदाची धुरा भारताचा महान लेग स्पिनर अनिल कुंबळेकडे सोपवण्यात आली आहे. पंजाबला आयपीएलच्या इतिहासात आजवर एकदाही विजेतेपद पटकावता आलेलं नाही. कुंबळेच्या साथीनं लोकेश राहुलची फौज किंग्स इलेव्हन फ्रँचायझीचं विजेतेपदाचं स्वप्न साकार करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

आकडेवारी काय सांगते?

आयपीएलच्या मैदानात दिल्ली आणि पंजाब हे दोन्ही संघ आजवर 24 वेळा आमनेसामने आले आहेत त्यात 14 वेळा पंजाबनं तर 10 वेळा दिल्लीनं बाजी मारली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSanjay Raut On BJP : भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक का झाली नाही? संजय राऊतांची टीकाCity 60 : सिटी सिक्स्टी शहरातील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट एका क्लिकवर ABP MajhaDevendra Fadnavis Full Speech : कोकणाचा आशिर्वाद पुन्हा महायुतीलाच मिळेल,फडणवीसांना विश्वास

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
बोगस शिक्षक भरती, बोगस पटसंख्या; जळगावमध्ये कोट्यवधींचा शैक्षणिक भ्रष्टाचार, मंत्र्यांनी घेतली दखल
Weekly Horoscope : 17 जूनपासून 'या' 4 राशींचं उजळणार भाग्य; एकामागोमाग मिळतील शुभवार्ता, जाणून घ्या मेष ते मीन सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी नवीन आठवडा कसा असेल? साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Embed widget