IPL 2020, DCvKXIP : दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका, 'हा' स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त
दिल्लीच्या संघात इशांत शर्माशिवाय हर्षल पटेल, मोहित शर्मा आणि आवेश खान हे भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. इशांतच्या अनुपस्थितीत या तिघांपैकी एकाला संधी मिळू शकते.
IPL 2020, DCvKXIP : आयपीएल 13 व्या सीजनचा दुसरा सामना आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात रंगणार आहे. पण सामन्याआधी दिल्ली कॅपिटल्सला मोठ झटका बसला आहे. क्रिकबजच्या वृत्तानुसार, दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा सराव सत्रात जखमी झाला आहे. त्यामुळे त्याला आजचा पहिला सामना खेळता येणार नाही, अशी दाट शक्यता आहे.
इशांतला पाठीला दुखापत झाली आहे. यापूर्वीही त्याला अनेकदा दुखापत झाली आहे. यावर्षी जानेवारीत इशांतला घोट्याला दुखापत झाली होती. एका महिन्यानंतर, तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत मैदानात परतला होता, परंतु तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला, त्यादरम्यान त्याला पुन्हा घोट्यात दुखापत झाली.
IPL 2020, DCvKXIP Preview: आयपीएलच्या मैदानात आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब आमनेसामने
दिल्लीच्या संघात इशांतशिवाय हर्षल पटेल, मोहित शर्मा आणि आवेश खान हे भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. इशांतच्या अनुपस्थितीत या तिघांपैकी एकाला आजचा सामना खेळायची संधी मिळू शकते.
दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब या दोन्ही संघांना एकदाही आयपीएलचा खिताब आपल्या नावे करता आलेला नाही. यावेळी चांगली कामगिरी करुन आयपीएलच्या जेतेपदावर नवा कोरावं याकडे दोन्ही संघांचं लक्ष असेल. आयपीएलमध्ये आतापर्यंत पंजाब आणि दिल्ली 24 वेळा आमने-सामने आले. त्यापैकी पंजाबने 14 वेळा विजय मिळवला आहे, तर दिल्ली संघाने 10 वेळा विजय मिळविला आहे.