Pooja Khedkar: "पोलिसांना रात्री घरी मीच बोलवलं", पूजा खेडकर यांचं स्पष्टीकरण; पण कारण सांगण्यास नकार
Pooja Khedkar: रात्री माझ्याकडे पोलिसाचे पथक आलं होतं ते मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी काही माहिती देण्यासाठी मी त्यांना बोलवले होते, असे पूजा खेडकर म्हणाल्या.
वाशिम: वादग्रस्त आयएएस पूजा खेडकरांची (Pooja Khedkar) स्थानिक पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा झाली. रात्री 11 ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती समोर आल्याने अनेक चर्चांना उधाण आले होते. अखेर पूजा खेडकरांनी समोर येत स्पष्टीकरण दिले आहे. पोलिसांचं पथक काही
माहिती घेण्यासाठी आलं होतं. वाशिम पोलिसांनी कसलीही चौकशी केली नाही, अशी माहिती पूजा खेडकरांनी दिली आहे.
पूजा खेडकर म्हणाल्या, रात्री माझ्याकडे पोलिसाचे पथक आलं होतं ते मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी काही माहिती देण्यासाठी मी त्यांना बोलवले होते. माझी कोणत्याही प्रकरणात चौकशी सुरू नाही कृपया गैरसमज पसरवू नये. दररोज नवीन खोट्या गोष्टी समोर येत आहे. कमिटी आहे ते त्यांचे काम करत आहेत. कमिटीच्या तपासानंतर सत्य समोर येईल आहे.
पूजा खेडकर आई वडिलांच्या संपर्कात
वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांच्या आई, मनोरमा अद्याप पुणे पोलिसांसमोर हजर झाले नसून त्यांच्या बंगल्याला भलं मोठं कुलूप लावण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलिस येऊन गेल्यानंतर हे कुलूप कुणी लावलं असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.याविषयी बोलताना पूजा खेडकर म्हणाल्या, माझ्या आई-वडिलांशी माझा संपर्क झालेला आहे.
पूजा खेडकरांच्या वाशिमच्या स्थानिक विश्रामगृहावर रात्री सव्वा दहा वाजता पोलीसांचे पथक
सनदी सहायक जिल्हाधिकारी पूजा खेडकर या मुक्कामी असलेल्या वाशिमच्या स्थानिक विश्रामगृहावर रात्री सव्वा दहा वाजता पोलीसांचे पथक पोहचले होते. जवळ पास पूजा खेडकर यांची बंद दाराआड तीन तास चौकशी पोलिसांनी केली. पोलिसांसोबत तब्बल साडेतीन तास चर्चा झाली रात्री 11 ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र हे पथक नेमकं वाशिम पुणे की अहमदनगरचे या वरुन कयास रंगू लागले आहेत. मात्र,अस असलं तरी वाशिम जिल्हाधिकारी यांच्या परवानगीने खुद्द पूजा खेडकर यांनी पोलिसांना काही माहिती देण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या वरून वाशिमच्या स्थानिक पोलीसाच एक महिला उपविभागीय अधिकारी नीलिमा आरज यांच्यासह दोन महिला पोलीस अधिकाऱ्यांनी वाशिमच्या विश्रामगृह येथे माहिती घेतली.
Video : पूजा खेडकरांच्या नॉन क्रिमीलेअर दाखल्याची छाननी
हे ही वाचा :
पूजा खेडकरच्या कुटुंबीयांची सगळी कुंडलीच बाहेर निघणार? इन्कम टॅक्सकडून मागवला डेटा, वडिलांचा रेकॉर्डही चेक होणार