एक्स्प्लोर

Pooja Chavan Death Case | मुख्यमंत्री हे 'मिस्टर सत्यवादी', पूजा चव्हाणला न्याय मिळणारच: संजय राऊत

पूजा चव्हाण प्रकरणाचा (Pooja Chavan Death Case) तपास सुरु असून त्या मुलीला आणि तिच्या कुटुंबाला निश्चितच न्याय मिळणार असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सांगितलंय

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री हे संवेदनशील आहेत, ते 'मिस्टर सत्यवादी' आहेत. त्यामुळे पूजा चव्हाणला न्याय मिळणारच असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलंय. एबीपी माझाशी संवाद साधताना खासदार संजय राऊत यांनी हे वक्तव्य केलंय.

संजय राऊत म्हणाले की, "पूजा चव्हाण प्रकरणी तपास सुरु आहे. मुख्यमंत्री हे अत्यंत संवेदनशील मनाचे आहेत. ते काही डोळे झाकून बसले नाहीत. मुख्यमंत्री हे कोणावरही अन्याय होऊ देणार नाहीत. त्यांचे राज्यातील प्रत्येक गोष्टीकडे लक्ष असते. या प्रकरणाचा तपास होणार आणि पूजा चव्हाण आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळणार."

चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून आज उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते आणि शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असते तर त्यांनी राठोडांना फाडून खाल्ल असतं असं वक्तव्य केलं आहे. त्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, "चित्रा वाघ या विरोधी पक्षात आहेत. त्यामुळे त्या आंदोलन करत आहेत. त्यांच्याकडे या प्रकरणाची अतिरिक्त माहिती असेल तर त्यांनी ती राज्याचे गृहमंत्री आणि तपास यंत्रणाना द्यावी."

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नसते तर राठोडांना फाडून काढलं असतं, खुर्ची एवढी वाईट आहे का? चित्रा वाघ यांचा सवाल

संजय राऊत हे चित्रा वाघ यांना सल्ला देताना म्हणाले की, "या प्रकरणात न्याय मिळाला नाही तर त्यांनी अशा पत्रकार परिषदा घ्याव्यात. या अशा प्रकरणांचा प्रसिद्धीसाठी कोणीही वापर करु नये."

संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपच्या वतीनं राज्यभर आंदोलन छेडलं आहे. त्यावर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की, "आंदोलन करु नये अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदींची आहे. महाराष्ट्राची परंपरा ही सत्यासाठी, न्यायासाठी लढणारी अशी आहे. त्यामुळे हा प्रश्न चर्चेतून सोडवावा. या प्रकरणी विरोधी पक्षांनी विधानसभेत प्रश्न विचारावेत."

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल केल्याच्या प्रश्वावर संजय राऊतांनी आपल्याला काही माहिती नसल्याचं सांगितलं. या प्रकरणी राज्याच्या गृहमंत्र्यांकडे अधिक माहिती असेल असंही त्यांनी सांगितलं.

पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.

Pooja Chavan Death Case | संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक, राज्यभर चक्का जाम आंदोलन

महत्त्वाच्या बातम्या

कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
BHMS Doctor Registration : मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! BHMS डॉक्टरांची नोंदणी बंद; न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत वैद्यकीय शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
Maharashtra Government Cabinet Decision: पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय
पंढरपुरातील विशेष पुनर्वसन धोरणास मंजुरी ते जायकवाडीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 6,477 कोटींची तरतूद; मंत्रिमंडळ बैठकीत 10 मोठे निर्णय

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Embed widget