अमरावती, दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरुन राजकारण तापलं! नेमकं घडलंय तरी काय?
अमरावती आणि दर्यापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांवरुन statues of Chhatrapati Shivaji Maharaj राजकारण तापलं आहे. दोन्ही ठिकाणी नेमकं काय घडलंय...
अमरावती : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर चार दिवसांपूर्वी आमदार रवी राणा यांनी मध्यरात्री कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या उड्डाणपुलाच्या मध्यभागी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता. परंतु या पुतळ्यावरून शहरात मोठे राजकारण तापले होते. आमदार रवी राणा यांनी कुठलीही परवानगी न घेता हा पुतळा बसवला होता.मात्र आज रविवारी पहाटे हा पुतळा शेकडो पोलिसांच्या बंदोबस्तात प्रशासनाने तfथून काढला आहे.ही कारवाई करताना आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या शंकरनगर येथील गंगा सावित्री निवाmस्थानी पोलिसांचा फौजफाटा ठेवला होता.
राणा दाम्पत्य पोलिसांच्या नजर कैदेत आहे.आताही आमदार रवी राणा यांच्या घरासमोर पोलीस मोठ्या प्रमाणावर तैनात आहे. दरम्यान पुतळा काढतेवेळी युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.मंत्री यशोमती ठाकूर यांनी पुतळा हटवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणल्याचा आरोपही युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.तर राणा यांच्या घराकडील दोन्ही रस्त्यावर पोलिसांनी बॅरिकेट लावले आहेत. तर ज्या ठिकाणावरून पुतळा हटवला त्याच ठिकाणी हा पुतळा बसवा अशी मागणी राणा समर्थकांनी केली आहे. तर रवी राणा व नवनीत राणा यांची अद्यापही प्रतिक्रिया समोर आली नाही
दर्यापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे रात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी अकोटचे आमदार प्रकाश पाटील भारसाकळे प्रयत्नशील आहेत. पेट्रोल पंप चौकामध्ये स्मारक उभे करण्याकरता जागा मंजूर केली होती. मात्र तरीही पुतळा उभारला जात नव्हता. मात्र काल सायंकाळी शिवसेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रातोरात बसवल्यानंतर घटनास्थळी पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात दिसून आला. शासनाने परवानगी दिली नसली तरी शहरातील सर्व राजकीय पक्ष व सर्व धर्मियांच्या वतीने हा पुतळा बसवण्यात आला. या संदर्भात काल सायंकाळी दोन वाजताच्या सुमारास नगरपालिका मुख्याधिकारी पराग वानखडे यांना निवेदन सुद्धा सादर करण्यात आले होते.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha