एक्स्प्लोर
Advertisement
31 डिसेंबरच्या रात्री 10 हजार वाहनांवर पोलिसांची कारवाई
31 डिसेंबरच्या रात्री वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या हजारो वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईत तब्बल 10 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई : दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री जगभर नववर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्ट्या केल्या जातात. रात्री अनेक जण दारु पिऊन वाहन चालवतात. तसेच अनेक ठिकाणी वाहतुकीचे नियम मोडले जातात. 31 डिसेंबरच्या रात्री वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या हजारो वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. मुंबईत तब्बल 10 हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या 455 वाहनचालकांवर सोमवारी रात्री कारवाई करण्यात आली. ओव्हर स्पीड आणि रॅश ड्रायव्हिंग करणाऱ्या 1 हजार 114 चालकांवर कारवाई करण्यात आली. तर वाहतुकीचे इतर नियम मोडणाऱ्या 9 हजार 121 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली. नवी मुंबई पोलिसांनीदेखील वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात सोमवारच्या रात्री मोठी मोही़म राबवली होती. यादरम्यान दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या 353 चालकांवर कारवाई करण्यात आली.
मुंबई, नवी मुंबईप्रमाणे सांगलीतही वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. सांगलीत वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या 224 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली, तर दारु पिऊन गाडी चालवणाऱ्या 92 जणांवर कारवाई करण्यात आली. 50 पेक्षा जास्त वाहने जप्त करण्यात आली. या कारवाईदरम्यान 68 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
सांगलीत वाहन चालवताना मोबाईल वापरणाऱ्या 12 जणांवर, ट्रिपलसीट वाहन चालवणाऱ्या 36, फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या २ आणि ड्रिंक अँड ड्राइव्हप्रकरणी ९२ जणांवर कारवाई करण्यात आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
क्राईम
निवडणूक
Advertisement