एक्स्प्लोर

गॅसने भरलेल्या टँकरचा ड्रायव्हर चालत्या गाडीत बेशुद्ध; पोलिसाच्या धाडसामुळे अनर्थ टळला

गॅसने भरलेल्या टँकरचा ड्रायव्हर चालत्या गाडीत बेशुद्ध झाल्याची घटना पुणे-सोलापूर महामार्गावर घडली. पोलीस नाईकाच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही या पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले आहे.

सोलापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर पोलीस नाईकच्या धाडसीवृत्तीमुळे भीषण अपघात होण्यापासून वाचला. पुणे-सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. गुरुवारी (10 सप्टेंबर) सकाळी 8.15 ते 8.20 च्या दरम्यान पुण्याहून सोलापुरच्या दिशेने एक गॅसने भरलेला टँकर येत होता. उरणवरुन निघालेला हा टँकर सकाळच्या सुमारास सोलापुरातील सावळेश्वर येथील पीएसआरडीसीएलच्या टोल नाक्यापर्यंत आला. या टोल नाक्यावर चालकाने टोल देखील भरला. मात्र, टोल भरल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यानंतर टँकर नागमोडी अंगावर येत असल्याचं कर्तव्य बजावत असलेल्या महामार्ग पोलीस कर्मचारी संजय चौगुले यांच्या लक्षात आलं. निरखुण पाहिल्यानंतर चालक बेशुद्ध अवस्थेत असल्याचे चौगुले यांना लक्षात आलं.

चौगुले यांच्यासह तेथे कर्तव्य बजावत असलेले इतर काही कर्मचाऱ्यांनी क्षणाचाही विलंब न करता टँकरच्या डाव्या बाजूने धाव घेण्यास सुरुवात केली. तर दोन कर्मचाऱ्यांनी टोलवरुन निघणारी इतर वाहतुक थांबवली. तर संजय चौगुले हे थेट टँकरच्या मागच्या बाजुने जाऊन चालकाच्या दिशेने धावू लागले. जवळपास 30 किलोमीटर प्रति तास वेगाने गाडी धावत होती, अशी माहिती संजय चौगुले यांनी दिली. जवळपास 100 ते 200 मीटरचा अंतर धाव घेत, चालत्या गाडीचा ताबा पोलीस नाईक संजय चौगुले यांनी घेतला. अत्यंत हुशारीने एका हाताने त्यांनी बेशुद्धावस्थेतून बाहेर पडणाऱ्या चालकाला वाचवलं तर दुसऱ्या हाताने स्टेअरिंग नियत्रिंत करुन गाडी जागीच थांबवली. त्यामुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळला.

त्यानंतर टोलनाक्यावर तैनात असलेली रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली. चालकावर प्राथमिक उपचार केल्यानंतर संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकाशी पोलिसांनी संपर्क केला. पर्यायी चालकाची व्यवस्था केल्यानंतर गाडी पुढच्या प्रवासासाठी रवाना झाली. टोलनाक्यापासून थोड्या अंतरावर अनेक वाहन चालक रात्री प्रवास करण्याचे टाळून बाजूला गाडी लावून झोपलेले असतात. त्याच ठिकाणी अनेक कॅन्टिन आणि धाबे देखील आहेत. या कॅन्टिन आणि धाब्यांवर सकाळी चहासाठी लोकांची मोठी वर्दळ असते. अशा परिस्थितीत गॅसने भरलेला टँकर जर पुढे गेला असता तर काय झालं असतं याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतो. घटनास्थळावर उपस्थित असलेल्या अनेकांनी या घटनेचे फोटो काढले. पाहता पाहता फोटो सोशल मीडियावर वायरल होऊ लागले.

बार्शीत दोन वर्षांपासून खोदून ठेवले रस्ते, नागरिक हैराण, राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून दखल

ही बातमी महामार्ग पोलीस दलाचे अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्यापर्यंत देखील पोहोचली. त्यांनी तात्काळ चौगुले यांच्याशी संपर्क करुन त्यांचे कौतुक केले तसेच बक्षिस देखील जाहीर केले. गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील ही माहिती कळताच ट्विट करुन त्यांनी चौगुले यांचे कौतुक केले. तर स्वत: फोन करुन देखील त्यांनी चौगुले यांचे अभिनंदन केले. दरम्यान घटनेची माहिती सोशल मीडियावर वायरल होताच सर्व स्तरावरुन पोलीस नाईक संजय चौगुले यांचे कौतुक होत आहे.

चालकाच्या आईला घटना कळताच कोसळले अश्रू, देवदुत पोलिसाचे मानले आभार

टँकर चालक अजय बाबासाहेब पाटील (वय 36) हा उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथील रहिवासी आहे. आपला मुलगा मोठ्या अपघातातून वाचल्याचं कळताच चालक अजय पाटील याचे वडील आणि आईं यांनी पोलीस नाईक अजय चौगुले यांचे आभार व्यक्त करण्यासाठी फोन केला. यावेळी त्यांना अश्रू अनावर झाले. काही दिवसांपूर्वी अजयचा दुचाकीवरुन पडल्याने अपघात झाला होता. त्यावेळी त्याच्या डोक्याला ईजा झाली होती. लातूरमध्ये उपचार करण्यासाठी अजय जाणार होता. मात्र, त्यापूर्वीच हा प्रकार घडला. पोलीस नाईक संजय चौगुले यांनी दाखवलेल्या धाडसामुळे आपल्या मुलाचे प्राण वाचले. त्यामुळे देवदुत असल्याची भावना चालक अजय पाटीलच्या आईने फोनवरुन बोलताना व्यक्त केली.

Former Navy Officer | पोलिसांवर राजकीय दबाव नाही, आरोपींवर कारवाई होणारच - विश्वास नांगरे पाटील

आफताब शेख हे एबीपी माझा वृत्त वाहिनीत सिनिअर करस्पॉन्डट म्हणून कार्यरत आहेत. मागील 9 वर्षांपासून एबीपी माझाच्या माध्यमातून कार्यरत असून आपल्या संवेदनशील आणि निष्पक्ष पत्रकारितेने त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 3 जुलै 2017 रोजी मुंबई येथील एबीपी माझाच्या मुख्य कार्यालयातून त्यांनी पत्रकारितेच्या प्रवासाला सुरुवात केली. फेब्रुवारी 2019 पासून ते सोलापूर येथे सिनिअर करस्पॉन्डन्ट म्हणून कार्यरत आहेत. सध्या ते सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

सोलापूरच्या राजकीय घडामोडींपासून सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, औद्योगिक, मनोरंजन, क्रीडा आणि व्यावसायिक क्षेत्रांतील महत्त्वाच्या विषयांना त्यांनी एबीपी माझाच्या माध्यमातून राज्यस्तरीय व्यासपीठ मिळवून दिले आहे. ‘कामगारांचे शहर‘ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूरमधील कामगारांचे प्रश्न, सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या आणि उपेक्षित घटकांचा आवाज शासनदरबारी पोहोचवण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न राहिला आहे. बहुभाषिक आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभलेल्या सोलापूरचा इतिहास, परंपरा आणि वर्तमानही त्यांनी आपल्या वार्तांकनातून प्रभावीपणे मांडले आहे. कोरोना काळात कोविड वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जाऊन रुग्णांच्या व्यथा आणि आरोग्य व्यवस्थेतील वास्तव समोर आणला तर महापूर-दुष्काळातील रिपोर्ट्समधून त्यांनी आपल्या संवेदनशील पत्रकारितेचा प्रत्यय दिला. सोलापूरसह मुंबई, पुणे, धाराशिव, लातूर, बीड, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांतही त्यांनी वार्तांकन केले आहे.

त्यांनी सोलापूरच्या दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयातून कला शाखेची पदवी, तर मुंबई विद्यापीठातून मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्याचीही त्यांना विशेष आवड आहे. महाविद्यालयीन जीवनातील सामाजिक योगदानासाठी 2016 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय सेवा योजना पुरस्काराने (Indira Gandhi NSS Award-2016) सन्मानित करण्यात आले. याशिवाय, पत्रकारितेतील योगदानासाठी त्यांना विविध संस्था आणि संघटनांकडून अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.
 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
Pune News: अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांसमोर मागणी; कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावूक, एकनाथ शिंदेही आठवणीने गहिवरले
अजितदादांच्या अपघाताबाबत स्पष्टता यावी, अहवाल लवकर यावा; देवेंद्र फडणवीसांची अमित शाहांसमोर मागणी; कार्यक्रमात सुनेत्रा पवार भावूक, एकनाथ शिंदेही आठवणीने गहिवरले

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Suryakumar Yadav : मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
मनावर भळभळती जखम, हातात तळपती बॅट, सूर्यकुमार यादवचा रुद्रावतार, अवघ्या 29 चेंडूत 82 धावांचं तुफान!
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 नोव्हेंबर 2026 | सोमवार
Columbus Marathi Movie : 'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
'कोलंबस'च्या निमित्ताने अंकुर वाढवेची अनोख्या इंडस्ट्रीत एन्ट्री! चित्रपटाचा धमाकेदार टीझर लाँच; 'या' तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Maha Pulse AI Project : शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
शासकीय आरोग्य व्यवस्थेवर आता AI ची करडी नजर! कोल्हापुरात राज्यातील पहिल्या 'महा-पल्स AI' प्रकल्पाचा शुभारंभ; तब्बल 104 रुग्णालये जोडली एकाच डॅशबोर्डला
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
जळगाव DCC बँक निवडणुकीतून भाजपा उमेदवाराची माघार; जयश्री पाटील बिनविरोध, महाजनांची प्रतिक्रिया
Shreyas Iyer : आम्ही माणसं आहोत मशीन नाही, आमचं मालिका विजयाचं ध्येय पूर्ण झालं, श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा
आम्ही माणसं आहोत मशीन नाही,श्रेयस अय्यरनं घेतला गौतम गंभीरशी पंगा,नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
भंडाऱ्यात अल्पवयीन मुलींना रात्री उशिरा बसमधून उतरवलं; वाहक चालकाचे निलंबन, परिवहनमंत्र्यांचा इशारा
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
राष्ट्रवादीचा महायुतीमध्ये येण्याचा निर्णय; पुण्यात अमित शाहांनी उलगडला अजित पवारांचा किस्सा, सांगितलं कारण
Embed widget