एक्स्प्लोर
सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला!
धुळे : सुरत-भुसावळ रेल्वे मार्गावर मोठा अपघात टळला. रेल्वेच्या इंजिनला लोखंडी पोल अडवे येऊनही मोटरमनच्या प्रसंगावधानाने नवजीवन एक्सप्रेसचा मोठा धोका टळला. जळगाव जिल्ह्यातील पाडसे रेल्वे स्थानकाजवळ ही घटना घडली.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पाडसे रेल्वे स्टेशन जवळील लावरी नाल्याजवळ रेल्वे लाईनचं काम सध्या सुरू आहे. हे काम सुरू असताना ठेकेदाराची माणसं पोल आणत असताना समोरून रेल्वे येत होती. रेल्वे येत असल्याचं पाहून ठेकेदाराच्या माणसांनी तो पोल तेथेच टाकून धूम ठोकली.
रेल्वे मार्गावरील हा पोल नवजीवन एक्सप्रेच्या इंजिनला धडकला. घटनेचं गांभीर्य लक्षात येताच मोटरमनने गाडीचा वेग कमी केला. तोपर्यंत तो पोल एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत रेल्वे इंजिनने ओढत आणला होता.
रेल्वेला धडकलेल्या पोलचे दोन तुकडे झाले. ठेकेदाराच्या चुकीमुळे ही घटना घडल्याचं तपास यंत्रणेचं प्रथमदर्शनी म्हणणं असलं तरी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.
मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेच्या चौकशीसाठी सुरत येथून एक उच्च स्तरीय समिती घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान या प्रकारामुळे नवजीवन एक्सप्रेसला अडीच तास उशीर झाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
क्रिकेट
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement