Modi Cabinet Portfolio : मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात मित्रपक्षांना कोणते खाते? अशी आहे यादी
Modi Cabinet 3.0 Portfolio: नरेंद्र मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात बहुतांश महत्त्वाची खाती ही भाजपने स्वतःकडे ठेवल्याचं दिसून येतंय.
PM Narendra Modi Cabinet Portfolio : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाच्या शपथविधी समारंभानंतर आता मंत्र्यांच्या खात्यांची विभागणी करण्यात आली. दुसऱ्या कार्यकाळाप्रमाणेच तिसऱ्या कार्यकाळामध्येही अनेक महत्त्वाची आणि मोठी मंत्रालयं ही भाजपने स्वतःकडे ठेवली आहेत. तर NDA मित्र पक्षांना MSME, विमान वाहतूक मंत्रालय, अवजड उद्योगांसह इतर महत्त्वाची मंत्रालये दिली आहेत. मोदींच्या मंत्रिमंडळात कोणत्या मित्रपक्षाला कोणती खाती देण्यात आली आहेत ते पाहूयात, NDA मित्र पक्षाला कोणते मंत्रिपद देण्यात आले ते जाणून घेऊया.
1. जीतन राम मांझी- सूक्ष्म, लघु , मध्यम उद्योग मंत्री (कॅबिनेट)
बिहार कोट्यातून मोदी सरकारमध्ये सामील झालेले हिंदुस्थान अवाम मोर्चाचे प्रमुख जीतन राम मांझी यांच्याकडे एमएसएमई मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. ते दलित समाजातून आले आहेत आणि बिहारचे मुख्यमंत्रीही राहिले आहेत. गया लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आहे.
2. लालन सिंह - संयुक्त जनता जल
जेडीयू नेते आणि मुंगेरचे खासदार राजीव रंजन सिंह उर्फ लालन सिंह यांना पंचायत राज मंत्री आणि मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे.
3. चिराग पासवान - लोक जनशक्ती पार्टी
लोक जनशक्ती पार्टीचे (रामविलास पासवान) प्रमुख चिराग पासवान हाजीपूर मतदारसंघातून विजयी झाले आहेत. चिराग पासवान यांच्याकडे अन्न प्रक्रिया मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
4. एचडी कुमारस्वामी - धर्मनिरपेक्ष जनता दल
कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांना अवजड उद्योग आणि पोलाद मंत्रालयाची जबाबदारी मिळाली आहे. कर्नाटकातील मंड्या लोकसभा मतदारसंघातून ते विजयी झाले आहेत.
5. राम मोहन नायडू - तेलगु देसम पार्टी
टीडीपी खासदार राम मोहन नायडू यांना विमान वाहतूक मंत्रालय देण्यात आले आहे. मोदी मंत्रिमंडळातील ते सर्वात तरुण खासदार आहेत. 2014 मध्ये वयाच्या 26 व्या वर्षी ते पहिल्यांदाच श्रीकाकुलम मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी सलग तीन वेळा येथून विजय मिळवला आहे.
6. जयंत चौधरी - आरएलडी
आरएलडी प्रमुख जयंत चौधरी यांना कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि शिक्षण मंत्रालयात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे.
7. प्रतापराव जाधव - शिवसेना
शिवसेना खासदार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्याकडे आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली आहे.
8. रामदास आठवले - आरपीआय
रिपब्लिन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) प्रमुख रामदास आठवले यांच्याकडे सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आली आहे.
9. अनुप्रिया पटेल - अपना दल (एस)
खासदार अनुप्रिया पटेल यांना आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयात राज्यमंत्री आणि रसायन आणि खते मंत्रालयात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे.
10. रामनाथ ठाकूर : संयुक्त जनता दल
जेडीयू नेते रामनाथ ठाकूर यांच्याकडे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या राज्यमंत्रिपदाची जबाबदारी आली आहे.
11. चंद्रशेखर पेम्मासानी - तेलगु देसम पार्टी
आंध्र प्रदेशातील गुंटूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार चंद्रशेखर पेम्मासानी यांना ग्रामीण विकास मंत्रालयात राज्यमंत्री आणि दळणवळण मंत्रालयात राज्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली आहे.
भाजपकडे महत्त्वाची मंत्रालयं
भाजपने गृहमंत्रालय, अर्थमंत्रालय, संरक्षण आणि परराष्ट्र मंत्रालयासारखी महत्त्वाची मंत्रालये ही स्वतःकडे ठेवली आहेत.
ही बातमी वाचा: