एक्स्प्लोर

PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान मोदींचा देहू दौरा, मोदींची भाषणाला मराठीतून सुरुवात

PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज देहूतील शिळा मंदिराचं लोकार्पण, आज मुंबईतल्या कार्यक्रमात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री एकाच मंचावर

LIVE

Key Events
PM Modi to visit Maharashtra LIVE Updates :  पंतप्रधान मोदींचा देहू दौरा, मोदींची भाषणाला मराठीतून सुरुवात

Background

PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : देहूतील संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूत येणार असून त्यांच्या स्वागताची देहूत जय्यत तयारी सुरु आहे. आज दुपारी 1 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान मोदींचं देहूत आगमन होणार आहे. सुरुवातीला पंतप्रधान देहूतील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर दुपारी दोन वाजता वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे अन्य नेतेही उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईतील कार्यक्रमांसाठी रवाना होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधानांच्या हस्ते ठिकठिकाणी उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.

मुंबईत मोदी-ठाकरे येणार एकाच मंचावर

आज पंतप्रधानांच्या हस्ते देहूतील श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. लोकार्पणानंतर दुपारी 2 वाजताच्या सुमारास त्यांची सभा होईल. देहू-देहूरोड मार्गावरील माळवाडीत 22 एकरच्या मैदानात सभा होईल. यासाठी तीन मंडप उभारले असून, चाळीस हजार भाविकांची बैठक व्यवस्था आहे. पुण्यातील कार्यक्रमानंतर पंतप्रधान मुंबईत येणार आहेत. सी विद्यासागर राव राज्यपाल असताना राजभवनात एक भुयार सापडलं होतं, त्या भुयारात गॅलरी स्थापन करण्यात आली आहे. या गॅलरीमध्ये चाफेकर बंधू तसंच सावरकर बंधू यांची चित्रे आणि प्रदर्शन करण्यात येणार आहे. त्याचं उद्धाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उपस्थित राहणार की नाही याची चर्चा असताना मुख्यमंत्री कार्यालयाकडून उद्धव ठाकरे कार्यक्रमाला हजर राहणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे बऱ्याच दिवसांनंतर मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एकत्र एका कार्यक्रमात दिसतील.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्वीट

संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देहूतील संत तुकाराम मंदिराच्या शिळा लोकार्पण कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्वीट केलं. ते म्हणाले, "मी उद्या पुणे आणि मुंबईमधील कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार असून महाराष्ट्रातल्या बंधू आणि भगिनीना भेटणार आहे. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या देहूतील मंदिराच्या शिळा लोकार्पणाच्या कार्याक्रमामध्ये सहभागी होणार आहे. संत तुकारामांनी आपल्या शिकवणीच्या माध्यमातून समाजाला दिशा दिली आणि विशेषत: दीनदुबळ्यांचं सबलीकरण केलं."

"मुंबईमधील राजभवनमध्ये क्रांतीकारकांच्या चित्रांचे प्रदर्शन असलेल्या गॅलरीचे उद्धाटन करणार आहे. 2016 साली राजभवनमध्ये एख भुयार सापडलं होतं. ब्रिटिशांच्या काळात या भुयाराचा वापर शस्त्रास्त्र ठेवण्यासाठी केला जायचा."

"तसेच या दौऱ्यादरम्यान मी मुंबई समाचारच्या द्विशताब्दी महोत्सव कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. पत्रकारितेमधील असा दीर्घ टप्पा पार केल्याबद्दल मुंबई समाचारची टीम आणि त्यांच्या वाचकांचे मी अभिनंदन करतो." 

17:44 PM (IST)  •  14 Jun 2022

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाला मराठीतून सुरुवात

PM Narendra Modi : राजभवन येथे क्रांतिकारी गॅलरीचा उद्घाटन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. यावेळी अनेक मान्यवर एकाच मंचावर उपस्थित आहेत. या दरम्यान भाषण करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोठी यांनी मराठीतू भाषणाला सुरुवात केली आहे. 

17:27 PM (IST)  •  14 Jun 2022

Uddhav Thackeray : पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण होणं हा चांगला मुहूर्त : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray : राजभवनातील क्रांतिकारी गॅलरीचा उद्घाटन सोहळा आज राजभवन येथे सुरु आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती या सोहळ्याला लाभली आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या भाषणात असे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींच्या हस्ते या वास्तूचं लोकार्पण होणं हा चांगला मुहूर्त आहे. 

14:50 PM (IST)  •  14 Jun 2022

देहुच्या नागरिकांना माझं वंदन....; पंतप्रधान मोदींची भाषणाला मराठीतून सुरुवात

14:30 PM (IST)  •  14 Jun 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणं आणि तुळशीचा हार देऊन सत्कार

PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुकाराम महाराज यांची पगडी, उपरणं आणि तुळशीचा हार देऊन वारकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.

14:26 PM (IST)  •  14 Jun 2022

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभा मंडपात आगमन

PM Modi to visit Maharashtra LIVE Updates : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सभा मंडपात आगमन झालं आहे. काही क्षणात पंतप्रधान मोदी वारकऱ्यांना संबोधित करणार आहेत.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Solapur : सोलापुरात महाविकास आघाडीत नेमकं काय घडतंय?Ulhas Bapat Vidhansabha Election 2024 : 26 नोव्हेंबरच्या आज  सरकार स्थापन झाल्यास राष्ट्रपती राजवटMVA Leaders Meeting : अपक्ष आमदारांशी मविआकडून संपर्क; निकालाआधीच मविआची सरकार स्थापनेचे रणनीतीABP Majha Headlines :  12 PM : 22 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
मोठी बातमी ! धावत्या बसमधील शेवटच्या सीटखाली नोटांचे बंडल; दोन दिवसांपूर्वीच निवडणूक कामांत होती ST
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदाचे फलक पुण्यात झळकले, पण लगेच काढले सुद्धा! पुण्यात राजकीय चर्चा रंगली
CNG Price Hike : सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! विधानसभेचं मतदान होताच CNG च्या दरात वाढ; दर किती रुपयांनी वाढले?
Embed widget