एक्स्प्लोर

पंतप्रधान मोदींचा उद्या केदारनाथ दौरा; आठ क्विंटल फुलांनी मंदिराची सजावट

PM Modi Visit kedarnath : पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिराला भेट देणार आहेत. त्यांच्या दौऱ्याची तयारी पूर्ण होत असून केदारनाथ मंदिराची आठ क्विंटल फुलांनी सजावट करण्यात येत आहे.

PM Modi in Kedarnath: पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ नोव्हेंबर रोजी केदारनाथ येथे भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ मंदिरात जोरदार तयारी सुरू झाली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला ८ क्विंटल फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. केदारनाथ धाम येथे पंतप्रधान मोदी दोन तास असणार आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत. 

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी या दौऱ्यादरम्यान विविध विकासकामांचे उद्घाटन, भूमीपूजन करणार आहेत. जवळपास १८० कोटी रुपयांच्या विकासकाम प्रकल्पांचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामध्ये संगम घाटाचा पुनर्विकास, प्राथमिक उपचार आणि पर्यटक सुविधा केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि रुग्णालय, दोन गेस्ट हाऊस, पोलीस स्टेशन, कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटर, मंदाकिनी आस्थापथ, वर्षा आश्रय आणि सरस्वती नागरिक सुविधा भवन आदींचा समावेश आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरस्वती आस्थापथ प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेणार आहेत. त्याशिवाय पूर्ण झालेल्या काही पायाभूत प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत. यामध्ये सरस्वती रिटेनिंग वॉल आस्थापथ व घाट, मंदाकिनी रिटेनिंग वॉल आस्थापथ, तीर्थ पुरोहित हाऊस आणि मंदाकिनी नदीवरील गरुड चट्टीचेही उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात पाचव्यांदा केदारनाथ येथे जाणार आहेत. याआधीदेखील त्यांनी  लोकसभा निवडणुकीच्या मतदानाआधी केदारनाथ येथे १८ मे २०१९ रोजी भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी तेथे जवळपास १७ तास साधना केली होती. 

येत्या काही महिन्यात उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांच्या या भेटीकडे पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे लक्ष या दौैऱ्याकडे लागले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Tiger Shroff: टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
टायगर श्रॉफवर गोळी झाडणाऱ्यांना अटक, दिल्लीमार्गे नेपाळला जाण्याची तयारी; अटकेनंतर पोलिसांनी दिली माहिती
Tiger Shroff Car Firing Marathi News: अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?
अंदाज खरा ठरला, एक आरोपी अल्पवयीन निघाला, दुसरा आरोपी मुंबईतील रॅपिडो रायडर; टायगर श्रॉफवरील हल्लेखोर सापडले, कुठेकुठे लपले?

व्हिडीओ

Gokul Election 2026: 3 मंत्री, 2 खासदार, 10 आमदारांचं चक्रव्यूह कसं भेदलं?,सतेज पाटील यांनी A टू Z सांगितलं!
Tiger Shroff Car Attack: बॉलिवूडमधली पहिली सुपारी ते टायगर श्रॉफवर गोळीबार, VIDEO
Mumbai Police PC On Tiger Shroff Firing : टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरण, पोलिसांची ईनडिटेल प्रेस | ABP Majha
Kolhapur Gokul : गोकुळ दूध संघाच्या मतमोजणीला वेग; दुसरी फेरी सुरू
Anandache Paan : 'आठवणींची साठवण' आणि 'सहवास प्रतिभावंतांचा', लेखक अशोक कोठावळे यांच्यासोबत संवाद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत; नारायण गडावरुन जरांगे पाटलांचा सरकारला इशारा, 5 प्रमुख मागण्या
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
जो नेता, पक्ष मराठ्यांच्या विरोधात जाईल, त्यांना 2029 ला पाडायचं; जरांगे पाटलांचा नारायणगडावरुन इशारा
Tiger Shroff attack: जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
जोराचा आवाज, मला वाटलं टायर फुटला अन् दुसऱ्याक्षणी छातीत प्रचंड वेदना व्हायला लागल्या, टायगर श्रॉफवरील हल्ल्यावेळी जखमी झालेला उमेश चौहान काय म्हणाला?
Gokul Election Result 2026: गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
गोकुळच्या निवडणुकीत बलाढ्य महायुती अन् हसन मुश्रीफांचं गणित कुठे चुकलं, सतेज पाटील काय म्हणाले?
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
दोन महिन्यांपूर्वी केलं टक्कल, आरोपी ऋतिक कुमारने बदलला लूक; टायगर श्रॉफवरील हल्ल्याचा रचला कट
Mohan Bhagwat on Smit Machchhar: हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं सरसंघचालक मोहन भगवतांकडून कौतुक
हिंदू म्हणजे संपूर्ण जगावर प्रेम करणारा, कॅप्टन स्मित यांनी जे केलं तो हिंदू स्वभाव; भारतीय कॅप्टन मच्छारांच्या धाडसाचं मोहन भगवतांकडून कौतुक, म्हणाले...
Salman Khan: सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
सलमान खानच्या घराबाहेर पोलिसांच्या हालचाली वाढल्या, गॅलेक्सी अपार्टमेंटच्या काचा लावल्या, नेमकं काय घडलं?
Mohan Bhagwat: 'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
'आंदोलनानं समस्या सुटणं सोपं नाही, काही अतिमहत्वकांक्षी लोक समाजविघातकांना पाठिंबा देतायत'; नागपुरातील विजयादशमी सोहळ्यातून मोहन भागवतांचं मोठं विधान, रिजीम चेंजवरही भाष्य
Embed widget