एक्स्प्लोर
Advertisement
फार्मसीच्या विद्यार्थीनीची कॉलेजमध्येच आत्महत्या
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये फार्मसीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शीतल जाधव असं या विद्यार्थिनीचं नाव आहे.
शीतलने महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन जीवन संपवलं.
शीतलच्या आत्महत्ये कारण अतिशय धक्कादायक आहे. दोन दिवसापूर्वी तिला वडिलांनी मारहाण केली होती. त्याच रागातून तीने हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येत आहे.
शीतलला तीन महिन्यापूर्वी लॅपटॉप घेतला होता, तो खराब झाला. मात्र रिपेअरसाठी तीने मावशीकडून पैसे घेतले. पण तू मावशीकडून न विचारता पैसे का घेतलेस, असा जाब विचारत तिच्या वडिलांनी तिला मारहाण केल्याचं सांगण्यात येत आहे.
शीतल आज कॉलेजला आली. तीने दोन तासांना हजेरीही लावली. त्यादरम्यान मैत्रिणीने तिच्या हातावर कसले व्रण उठलेत, असं विचारलं. त्यावर शीतलने घडलेला सर्व प्रकार सांगितलं.त्यानंतर शीतल महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि थेट खाली उडी मारली. यावेळी तिचा जागेवरच मृत्यू झाला.
दरम्यान, याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement