एक्स्प्लोर
प्रेयसीच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या, प्रियकराचीही आत्महत्या
आरोपीने महिलेकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र ती लग्नाला तयार होत नसल्याने दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. त्यानंतर आरोपीने तिच्या घरी जाऊन तिच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली.

पिंपरी चिंचवड : महिलेचे प्रेमसंबंध तिच्या सात वर्षीय मुलीच्या जीवावर बेतले आहेत. संबंधित महिलेच्या प्रियकराने तिच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या केली. त्यानंतर स्वतःही गळफास घेऊन आत्महत्या केली. पिंपरी चिंचवडच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनियरिंग म्हणजेच सीएमई परिसरात ही धक्कादायक घटना घडली. विजय बहादूर यादव असं आरोपीचं नाव होतं. महिलेच्या पतीचं निधन झालं आहे. महिला आणि आरोपी विजय सीएमईच्या कँटिनमध्ये कामाला होते. इथेच दोघांचे प्रेमसंबंध जुळले. सीएमई परिसरात राहणाऱ्या महिलेच्या घरी विजयचं येणं-जाणं सुरु झालं. विजय कुटुंबीयांपासून दूर राहत असल्यामुळे त्याने महिलेकडे लग्नाचा तगादा लावला होता. मात्र ती लग्नाला तयार होत नसल्याने काल दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं होतं. महिला आणि तिची बहीण आज सकाळी घराबाहेर पडताच विजय घरात घुसला. त्याने महिलेच्या चिमुरड्या लेकीवर बलात्कार करुन तिची हत्या केली. मृतदेहाशेजारीच त्याने गळफास घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो फसल्याने जवळच्या जंगलात जाऊन आत्महत्या केली. भोसरी पोलिसांना नराधम विजयचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
व्यापार-उद्योग
भारत
नागपूर























