एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पिंपरी - मेट्रोची मोठी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळली
पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा येथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. नेमका हा प्रकार कसा घडला हे अजून अस्पष्ट आहे. मात्र मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून संताप व्यक्त केला जातोय.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये मेट्रो बांधकामादरम्यान खड्डे पाडणारी भली मोठी ड्रिल मशिन रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडच्या नाशिक फाटा येथे दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. नेमका हा प्रकार कसा घडला हे अजून अस्पष्ट आहे. मात्र मेट्रोचा हा भोंगळ कारभार पाहून संताप व्यक्त केला जातोय.
पुण्यात जाहिरातीचा फलक पडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होता होता राहिल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झालं आहे. ही ड्रिल मशिन जर रस्त्यांवरुन जात असलेल्या वाहनांवर पडली असती तर या भल्या मोठ्या ड्रिल खाली अनेक वाहनांचा चुराडा झाला असता. हे काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. मेट्रो प्रशासन मात्र याबाबत उदासीन असल्याचं वेळोवेळी दिसून येत आहे.
काही दिवसापूर्वीच पुण्यातील जुना बाजार चौकात अनधिकृतपणे उभारलेलं होर्डिंग अंगावर पडून चार जणांचा मृत्यू झाला होता, तर आठ जण गंभीर जखमी झाले होते. या चौकातून निघालेल्या पाच रिक्षा आणि एका कारमधील प्रवासी होर्डिंग्जच्या अँगल्सखाली आले होते. त्याचीच पुनरावृती आज होता-होता राहिली. मात्र आजच्या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
निवडणूक
Advertisement