एक्स्प्लोर
पिंपरी चिंचवडमध्ये तलवारीच्या धाकावर चार फ्लॅट्स लुटले, 15 लाखांचा ऐवज लंपास
पिंपरी चिंचवडमध्ये दिवसेंदिवस सशस्त्र हल्ले वाढू लागले आहेत. त्यातच आता चोरट्यांनी तलवारी कोयत्याच्या धाकावर चार फ्लॅट लुटले. कोणी प्रतिकार केला असता तर कदाचित एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये सशस्त्र हल्ले वाढू लागले आहेत. अशातच नंग्या तलवारी नाचवत रावेतमध्ये एकाच सोसायटीतील चार फ्लॅट चोरट्यांनी लुटले आहेत. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेत जवळपास 15 लाख रुपयांचा ऐवज लुटल्याचं समोर आलं आहे. मात्र कोणी प्रतिकार केला असता तर कदाचित एखाद्याच्या जीवावर बेतलं असतं.
शंकेश्वर सोसायटीत मंगळवारी पहाटे तीन ते साडे तीनच्या सुमारास हे चोरटे घुसले. हातात तलवारी, कोयते आणि कटवणी घेऊन हे चोरटे आले होते. कटवणीच्या साहाय्याने जे लॉक उघडले जात होते, असेच चार फ्लॅटचे लॉक चोरट्यांनी तोडले. पंधरा लाखांचा ऐवज लंपास केल्याची माहिती समोर येत आहे.
या चोरट्यांनी पुढची हुशारी दाखवत जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं कनेक्शन तोडून चोरटे पसार झाले. पण एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झालाच. याच फूटेजच्या आधारे आता देहू रोड पोलिस चोरट्यांचा शोध घेत आहेत.
VIDEO | पिंपरी चिंचवडमध्ये तलवारीच्या धाकावर चार फ्लॅट्स लुटले
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement