एक्स्प्लोर
Advertisement
पिंपरी-चिंचवडचा गोल्डमॅन दत्ता फुगेची दगडाने ठेचून हत्या
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडमधील गोल्डमॅन दत्तात्रय फुगेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. दिघीमध्ये गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. वाढदिवसाचा कार्यक्रम आटोपून घरी येताना हा प्रकार घडला.
चिटफंड व्यवसायाच्या घोटाळ्यातून फुगेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. अतुल मोहिते, बाळा वाळके, शैलेष वाळके आणि त्यांच्या सात ते आठ साथीदारांनी त्यांची हत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली आहे.
दत्तात्रय फुगेची सोन्याच्या शर्टची देशभरात चर्चा होती. इतकंच नाही तर फुगेची गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली होती. सर्वांत महागडा सोन्याचा शर्ट खरेदी करण्याचा विक्रम दत्ता फुगेच्या नावावर नोंदवण्यात आला होता.
दरम्यान, फुगेच्या पत्नी सीमा फुगे या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
महाराष्ट्र
क्राईम
राजकारण
Advertisement