एक्स्प्लोर
बाटलीत पेट्रोल न दिल्याने पिंपरीत पेट्रोल पंपाची तोडफोड

पिंपरीः बाटलीत पेट्रोल दिलं नाही म्हणून 8 ते 10 जणांच्या टोळक्याने देहू रोडवरच्या शिंदे पेट्रोल पंपाची तोडफोड केली आहे. काल रात्री साडे नऊच्या सुमारास ही घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या ग्राहकाने बाटलीमध्ये पेट्रोल मागितलं. मात्र कायदेशिररित्या बाटलीत पेट्रोल देता येत नसल्याचं सांगत पंपावरच्या कर्मचाऱ्याने त्याला पेट्रोल देण्यास नकार दिला.त्यामुळे चिडलेल्या इसमाने आणि त्याच्या साथीदारांनी पेट्रोल पंपावरच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत 6 मशिन फोडल्या. दरम्यान पेट्रोल पंप हे ठिकाण अत्यंत संवेदनशील असल्याने या ठिकाणची तोडफोड ही गंभीर बाब आहे. पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. तसेच पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखी संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. पाहा व्हिडिओः
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
हिंगोली
छत्रपती संभाजी नगर
विश्व























