एक्स्प्लोर
कर थकवल्यानं चक्क पोलीस स्टेशनलाच सील ठोकलं!
भंडारा: भंडाऱ्यातल्या पवनी नगरपालिकेनं चक्क पोलीस स्टेशनलाच सील ठोकलं आहे. गेल्या तीन वर्षींपासून पोलीस स्टेशननं पालिकेचा 1 लाख 19 हजारांचा कर थकवला आहे. त्यामुळे पालिकेनं ही कारवाई केली आहे.
पोलीस स्टेशनलाच सील ठोकण्यात आल्यानं तक्रार दाखल करण्यासाठी आलेल्या नागरिकांना मात्र, त्रास सहन करावा लागला.
दरम्यान, या महिन्यातच काही दिवसात थकीत कर भरण्याचं आश्वासन दिल्यानंतर आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर दोन तासांनी सील काढण्यात आलं. दुसरीकडे पवनी नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी वीज वितरण कंपनीचं कार्यालय आणि पाटबंधारे विभागाच्या कार्यालयालाही सील ठोकलं आहे.
पवनी नगरपरिषदेला नगरविकास खात्याकडून मिळालेल्या आदेशानुसार प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकरी माधुरी मडावी यांनी पवनी शहरातील नागरिकांडून थकीत कर वसूल करणं सुरु केलं आहे. यात खाजगी मालमत्ता धारकांसह शासकीय कार्यालयांचा देखील समावेश आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement