एक्स्प्लोर
Advertisement
पत्नी पीडितांसाठी हक्काचं माहेर, औरंगाबादमध्ये आश्रमाची सुरुवात
औरंगाबाद : पत्नी पीडित पुरुष आश्रम, औरंगाबाद-शिर्डी रस्त्यावर हा बोर्ड आणि इमारत सध्या चर्चेचा विषय आहे. कारण इथे पत्नी पीडितांनी एकत्र येऊन आश्रम सुरु केला आहे. कायदे महिलांच्या बाजूने आहेत, समाजाची सहानुभूती महिलांना मिळते. त्यामुळे काहीवेळा पुरुषाची चूक नसतानाही नाहक त्रास सहन करावा लागतो.
त्यामुळे भरत फुलारेंनी हा आश्रम स्थापन केला आहे. जागतिक पुरुष हक्क दिनाचं (19 नोव्हेंबर) औचित्य साधून या आश्रमाचं उद्धाटन करण्यात आलं. सध्या या आश्रमात सहा जण राहतात. स्वत:ची कामं स्वत: करतात.
काही जणांवर हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप आहे. काही जणांविरोधात शारीरिक आणि मानसिक छळाची तक्रार आहे. त्यांना कायदेशीर मदत करणं, मानसिक आधार देणं, त्यांना स्वत:च्या पायावर उभं करण्यासाठी पत्नी पीडित संघटना झटत आहे
पत्नी पीडितांच्या या आश्रमाला खोट्या केसेसमुळे अडचणीत आलेल्यांनी फंडिंग केलं आहे. त्याशिवाय वर्कशॉपच्या माध्यमातून मिळणारं उत्पन्न यावर आश्रमाचा कारभार चालतो.
घटस्फोटांच्या केसेसमध्ये गेल्या काही वर्षात वाढ होताना दिसत आहे. त्यामागची कारणं अनेक आहेत, पण विभक्त होतानाही काही वेळा मानसिक छळाचे प्रकार घडतात. काही वेळा न्यायालयीन लढाईत पुरुष आणि स्त्री दोघांचंही मानसिक आणि आर्थिक खच्चीकरणही होतं. जे भरुन निघणं अवघड आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
अमरावती
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement