एक्स्प्लोर
मोदींच्या गोमूत्रावर फडतूस लोक आमदार झाले : पतंगराव कदम
सांगली : आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी परिचीत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांची विरोधकांवर टीका करताना जीभ घसरली. पंतप्रधान मोदींच्या गोमूत्रावर फडतूस लोक निवडून आल्याचं वादग्रस्त वक्तव्य पतंगराव कदमांनी केलं आहे.
तसंच भाजप-शिवसेनेच्या युती सरकारने सहकार संस्था आणि शिक्षण संस्था मोडायचा उद्योग लावल्याचा आरोपही पतंगराव कदम यांनी केला आहे. सांगलीत पत्रकारांशी वार्तालाप करताना पतंगरावांनी स्वपक्षीयांसह भाजपवर जोरदार शरसंधान साधलं.
आपली राजकीय कारकीर्द धोक्यात आणण्यासाठी सांगलीपासून दिल्लीपर्यंत कटकारस्थानं झाली. माझ्याविरोधात लॉबिंग झालं. मात्र मी सर्वांना पुरुन उरल्याचं म्हणत पतंगराव कदमांनी स्वपक्षीयांवर नाव न घेता टीका केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
बीड
क्रीडा
विश्व
Advertisement