एक्स्प्लोर

मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर प्रवाशांची फसवणूक, फास्टटॅगच्या माध्यमातून डबल टोल वसूली

केंद्र सरकारने फास्ट टॅगची सुविधा आणत प्रवाशांचा वेळ वाचवण्याचं ठरवलं आहे पण फास्ट टॅगच्या या सुविधेतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्यांकडून डबल टोल आकारला जात आहे. रोज अशा तक्रारी येत असल्याची टोल वसूल करणाऱ्या कंपनीनेही मान्य केलं आहे.

पिंपरी - चिंचवड :  महामार्गावरील टोल सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. याच टोलवर केंद्र सरकारने फास्ट टॅगची सुविधा आणत प्रवाशांचा वेळ वाचवण्याचं ठरवलं आहे. पण फास्ट टॅगच्या या सुविधेतून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर प्रवास करणाऱ्यांकडून डबल टोल आकारला जात आहे. रोज अशा तक्रारी येत असल्याचं टोल वसूल करणाऱ्या कंपनीने ही मान्य केलं आहे. द्रुतगती मार्गावरून मुंबई ते पुणे प्रवास करताना चारचाकीसाठी 230 रुपये टोल आकारला जातो. मात्र राहुल रुकारी यांना मुंबईला जाताना तळेगाव टोल नाक्यावर फास्ट टॅगच्या खात्यातून 173 रुपये कट झाले. मात्र तसा मेसेज त्यांना आला नाही. त्यामुळं रोख 230 रुपये घेऊन टोल आकरला गेला. पण काही अंतरावर गेल्यानंतर 173 रुपये खात्यातून कट झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे राहुलना एकूण 403 रुपये टोल भरावा लागला. त्यामुळे पुण्याला येताना त्यांनी खबरदारी घेत खालापूरला रोख 230 रुपयांचे टोल फाडला. पण तळेगावला फास्ट टॅग स्कॅन झालं आणि पुन्हा 173 म्हणजे एकूण 403 रुपये वसूल करण्यात आले. म्हणजे राहुलला तब्बल 346 रुपये अधिक मोजावे लागले. तर सूर्यकांत पारेख यांचे मात्र मुंबईहून पुण्याला येताना फास्ट टॅगमधून खालापूरला 173 रुपये आणि तळेगाव टोल नाक्यावर 57 रुपये आकारण्याऐवजी पुन्हा 173 रुपये असा एकूण  346 रुपये टोल घेतला गेला, म्हणजे त्यांची 116 रुपयांची लूट झाली. Inflation | महागाईचा दर तब्बल 7.35 टक्क्यांवर, सामान्यांना काय वाटतं? | ABP Majha महामार्गावर टोल किती आकारावा, टोल वसूल करण्याची मुदत किती असावी यावर सरकार तोडगा काढू शकलेली नाही. पण याच टोल नाक्यावर वाहनांच्या रांगेत जाणाऱ्या वेळेची बचत करण्यासाठी सरकारने देशभर फास्ट टॅगची सुविधा आणली. राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करताना आता चारचाकी वाहनांना फास्टटॅग बसवणे अनिवार्य आहे. फास्टटॅगमुळे 12 हजार करोड रूपयांची बचत होणार आहे. मनुष्यबळ आणि इंधनबचत याचा खर्च वाचणार आहे. तरी चारचाकी आणि त्यापुढील वाहनधारकांनी फास्टटॅग बसवून घ्यावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे. टोल वसूल करणाऱ्या सहकार ग्लोबल कंपनीने त्यांच्याकडे याबाबत तक्रारी येत असल्याचं मान्य केलं आहे. मात्र याचं अधिकृतरीत्या स्पष्टीकरण देण्यास त्यांनी नकार दिला आहे. द्रुतगती मार्गावर आकारला जाणारा टोल आणि त्याला वारंवार दिली जाणारी मुदत वाढ हा विषय नेहमीच वादाचा ठरला आहे. आता त्यात फास्ट टॅगच्या लूटीची भर पडली आहे. द्रुतगती मार्गावरून रोज लाखभर वाहन ये जा करतात. संबधित बातम्या : मुंबईत बाथरुममध्ये गुदमरुन मुलीचा मृत्यू, गिझरमधील वायूमुळे दुर्दैवी अंत रस्त्यांच्या कामात मराठवाड्यातले लोकप्रतिनिधीच मोठा अडथळा; गडकरींचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्या

Yunus Shaikh and Eknath Shinde: शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
शिवसेनेत प्रवेश केल्याचं नाकारलं, पण एकनाथ शिंदेंचं शिवसैनिकालाही लाजवेल इतकं कौतुक केलं, युनुस शेख नक्की कोणत्या पक्षात?
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Maharashtra Live blog updates: ठाणे जिल्ह्याची भविष्यातील तहान भागवणारे काळू धरण प्रकल्पावरील 10 वर्षांची स्थगिती उठवली
Nana Patekar: भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
भाजपने नाना पाटेकरांना दिली होती लोकसभेची ऑफर, पण नाना फडणवीसांना म्हणाले, आशिष शेलारांनी काय सांगितलं?
Raju Shetti: राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन
राज्यात आजपासून ऊस गळीत हंगाम सुरू अन् शेतकरी आणि कारखानदारांमद्ये संघर्षाची ठिणगी; राजू शेट्टींनी आंदोलनाची दिशा बदलली, कृष्णा साखर कारखान्यावर आज काटा बंद आंदोलन

व्हिडीओ

Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी
CJP Delhi : सीजेपीच्या दोन नेत्यांना न्यायालयीन कोठडी | Saurabh Das Ashutosh Ranka Judicial Custody

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार, सर्जियो गोर यांच्याकडून मोठी अपडेट...
भारतावर 100 टक्के टॅरिफचं संकट? ट्रम्प येत्या 10 दिवसात 'त्या' कायद्याबाबत निर्णय घेणार
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
मग शक्तिपीठ महामार्गासाठी हजारो कोटी रुपये कुठे येत आहेत? जयंत पाटलांचा हल्लाबोल, सतेज पाटील म्हणाले, प्रकल्प माथ्यावर मारून शेतकरी उद्ध्वस्त का करताय?
Pune Crime News: गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
गैरहजेरीचा जाब विचारल्याने वरिष्ठांशी वाद; 'मी आयुष्य संपवतोय..'! मेसेज पाठवून अंमलदार बेपत्ता; पोलिसांची काही तास धावपळ, नंतर एका बारमध्ये...,पुण्यातील घटना
Abhijeet Dipke on Imran Khan: 'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
'अमेरिकन मेरी मिल्बेन भाजपच्या बाजूनं बोलू शकते, पण इम्रान खान OCI कार्डधारक असूनही भाजपच्या विरोधात..' अभिजित दिपकेंचा हल्लाबोल
SBI: स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, रेपो रेट वाढताच व्याज दर वाढवले, EMI महागणार, काय बदल झाले? जाणून घ्या
स्टेट बँक ऑफ इंडियाचा ग्राहकांना धक्का, व्याज दर वाढवले, EMI महागणार
Global Diesel Crisis : डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
डिझेलचा भयंकर तुटवडा! दिवाळीनंतर इंधनाचे दर भडकणार? IEA च्या अहवालाने वाढवली धास्ती
Gold Rate Today: सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
सोन्याचे भाव पुन्हा कोसळले; दर घसरण्यामागची काय आहेत कारण? जाणून घ्या किंमत
Embed widget