एक्स्प्लोर

Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ

Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मिसिंग लिंकवरच्या अपघातात दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर, अन्य तिघे सुखरुप बचावले आहेत. 

Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील (Mumbai Pune Expressway) मिसिंग लिंकवरील (Missing Link Accident) बोगद्यात झालेल्या भीषण अपघातानं (Accident Update) खळबळ उडाली आहे. पुण्याहून (Pune News) मुंबईकडे (Mumbai News) जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनरनं मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या एका मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की, दोन्ही गाड्यांचा चक्काचूर झाला आहे. अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी आहे. तर, अन्य तिघे सुखरुप बचावले आहेत. 

पुण्याहुन मुंबईकडे जाताना मिसिंग लिंकच्या टनलमध्येच अपघात झाला. अपघातानंतर दोन तास मुंबईकडे जाणारी वाहतूक मिसिंग लिंकमधून बंद जुन्या मार्गानं वळवण्यात आली होती. अपघातग्रस्त वाहानं महामार्गावरून हटवल्यानंतर मुंबईकडील लेन पूर्ववत करण्यात आली. 

अपघात नेमका झाला कसा? (Mumbai Pune Expressway Missing Link Accident)

मुंबई–पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग लिंकवरील बोगद्यात रात्री दीड वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दोन्ही गाड्यांचा पुरता चक्काचूर झाल्याचं पाहायला मिळालं. पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्युनरनं मुंबईच्या दिशेनं भाजीपाला वाहतूक करणाऱ्या एका मालवाहू टेम्पोला जोरदार धडक दिली आहे. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी असल्याची माहिती समोर आलीय.,या अपघातात अन्य तिघेजण सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फॉर्च्युनरमधील सर्व पाचही जण पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील भूमकर चौक परिसरातील रहिवासी आहेत. त्यांच्यापैकी तुषार भूमकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.  

अपघातानंतर पर्यायी मार्गानं वळवण्यात आलेली वाहतूक पूर्ववत 

अपघातानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक सुमारे दोन तास बंद ठेवत सर्व वाहनं जुन्या मार्गानं मुंबईकडे वळविण्यात आली होती. महामार्ग पोलीस, आयआरबी पथक देवदूत  आणि मदत यंत्रणांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. दोन्ही अपघातग्रस्त वाहनं महामार्गावरून हटवल्यानंतर मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास महामार्ग पोलीस करत आहेत.

पाहा व्हिडीओ : मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, अंगावर शहारे आणणारा VIDEO

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Nirmala Nawale : कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवलेंची मोठी झेप; राष्ट्रवादीच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निवड
Pune Crime: येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
येरवडा जेलबाहेर फटाकेबाजी करत कैदी गुंडाचं बर्थ-डे सेलिब्रेशन; 'हॅपी बर्थडे सुलतान भाई' म्हणत सोशल मीडियावर व्हिडिओ; पोलिसांनी खाकीचा हिसका दाखवला अन्...
Pune RTO: पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
पुणेकरांसाठी मोठी बातमी! 'MH 12 ZZ' नंतर गाड्यांवर कोणती सिरीज येणार? मुरलीधर मोहोळ-नितीन गडकरींच्या भेटीनंतर महत्त्वाची माहिती समोर
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
Mumbai Railway: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या फलाट क्रमांक 16 वरील ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉकला पुन्हा मुदतवाढ; मेल-एक्सप्रेस गाड्यांवर होणार परिणाम
Bhandara Crime News: भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
भंडारा हादरलं! अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार; संतप्त नागरिकांकडून नराधमाला चोप, शहरात आज कडकडीत बंद
Eknath Shinde and PM Modi: सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचा खटला निर्णायक वळणावर, जेन झी आंदोलनाचेही पडसाद, एकनाथ शिंदे पंतप्रधान मोदींना भेटणार
Nagpur Crime: वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; ऑनलाइन कंपनीतील कामगिरीच्या स्पर्धेतून जीवघेणा हल्ला, दोघांना अटक
वेळेत डिलिव्हरी करणं पडलं महाग! चांगला इन्सेंटिव्ह मिळवतो म्हणून सहकाऱ्यानंच डिलिव्हरी बॉयचा काटा काढला; दोघांना अटक, नागपूर हादरलं
Manoj Jarange Patil and Pravin darekar: फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
फडणवीसांवर टीका करताच प्रवीण दरेकरांनी मनोज जरांगेंची अक्कलच काढली, म्हणाले, 'नाक्यावर आंदोलन करणं आणि...'
Nikita Rawal Angry On Ranbir Kapoor: 'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
'गोमांस खाणारा राम कसा साकारू शकतो?'; 'रामायण'मध्ये रणबीर कपूरच्या कास्टिंगवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा आक्षेप, चालवतेय बायकॉट ट्रेंड
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Maharashtra Live blog updates: सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाचे नाव बदलाला राष्ट्रवादी शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेडचा विरोध
Embed widget