एक्स्प्लोर
शाळांच्या फी वाढीविरोधात पुण्यात विनोद तावडेंना पालकांचा घेराव
पुणे : राज्यातील शाळांमध्ये बेकायदेशीरपणे होणाऱ्या फी वाढीविरोधात पुण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडेंना घेराव घालण्यात आला. पुण्यातील पालक संघटनांनी विनोद तावडेंना घेराव घातला.
फी वाढीबाबत लवकरात लवकर निर्णय घ्या, अशी मागणी विनोद तावडे यांच्याकडे करण्यात आली. या विषयाबाबत पुन्हा सुनावणी घेऊ, असं आश्वासन देऊन विनोद तावडे निघून गेले.
पुण्यातील भारती विद्यापीठाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी विनोद तावडे पुण्यात आले होते. दरम्यान राज्यातील शाळांमध्ये होणारी फी वाढ हा पालकांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळेच पुण्यात पालक संघटनांनी आंदोलन केलं.
राज्यभरातील शाळांचीही हीच स्थिती आहे. त्यामुळे सरकार यावर काय भूमिका घेणार, ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement