एक्स्प्लोर
परळी औष्णिक विद्युत केंद्र तब्बल 13 महिन्यांनी सुरु होणार!
बीडः पाण्याअभावी बंद पडलेले बीडमधील परळीचे औष्णिक विद्युत केंद्र तब्बल 13 महिन्यांनी सुरु होणार आहे. या केंद्रातील युनिट क्रमांक 6 आणि 7 सुरू करण्यात येणार असून पुढील एक वर्ष गावकऱ्यांना वीजपुरवठा होऊ शकतो.
केंद्रासाठी जायकवाडी धरणातून पाणी सोडण्यासाठी सुरुवात करण्यात आली आहे. एकूण चार टप्प्यांमध्ये पाणी सोडण्यात येणार असून पहिल्या टप्प्यातील पाणी सोमवारपर्यंत केंद्राला मिळणार आहे. त्यामुळे तब्बल 13 महिन्यांनंतर परळी औष्णिक विद्युत केंद्र सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
अखेर माजलगाव धरणाचाही घसा ओला
परळी केंद्रासोबतच जायकवाडी धरणातील 820 दलघमी पाणी माजलगाव धरणात सोडण्याचा निर्णय शासनाने मागील महिन्यात झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेतला होता. बीडच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी त्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती.
जायकवाडी धरणातील पाणी सोडण्याच्या निर्णयामुळे बीड जिल्हयातील काही भागाचा पाणी प्रश्न सोडण्यास मदत होणार आहे. पंकजा मुंडे या माजलगाव धरणात सोमवारी जलपूजन करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement