एक्स्प्लोर
Advertisement
पनवेल महापालिकेत दारुबंदीचा प्रस्ताव एकमताने मंजूर
पनवेल महापालिका रायगड जिल्ह्यातील पहिलीच महानगरपालिका असून, गेल्याच वर्षी म्हणजे 2016 साली अस्तित्वात आली.
पनवेल (रायगड) : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात दारुबंदी करण्याचा प्रस्ताव सोमवारी (18 डिसेंबर) महासभेत पास करण्यात आला. महत्त्वाचं म्हणजे या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे.
सत्ताधारी भाजप पक्षाचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पूर्णपणे दारुबंदी करण्यात यावी, असा प्रस्ताव महासभेत ठेवला होता. विरोधी पक्षातील शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नगरसेवकांनी पाठिंबा बिनविरोध हा प्रस्ताव पास करण्यात आला आहे.
पनवेल शहरात दारुबंदीचा प्रस्ताव सभागृहात बहुमताने मंजूर केल्याने, आता महापालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे आणि राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
पनवेल महापालिका रायगड जिल्ह्यातील पहिलीच महानगरपालिका असून, गेल्याच वर्षी म्हणजे 2016 साली अस्तित्वात आली.
संबंधित बातम्या
LBT भरा, अन्यथा कारवाई, पनवेल मनपा आयुक्तांचा कारखानदारांना इशारा
पनवेल महापालिका क्षेत्रात नागरी सुविधांचा बोजवारा
पनवेल महापालिका निकाल, भाजपला स्पष्ट बहुमत
दारुबंदीच्या प्रस्तावावर नागरिकांच्या प्रतिक्रिया
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement