![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
Kisse Pracharache Seg 04 : किस्से प्रचाराचे, रिपोर्टर 'माझा'चे; महायुती की मविआ कुणाची बाजी?
मला जे काम करायला शरद पवार सांगतील ते मी करणार, मी काही मागितले नाही, मी कधी मागणार देखील नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. आव्हाड यांनी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या दाव्यावरून टोला लगावला आहे. गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो अजित पवार यांच्या गुलाबी रंगावरून आव्हाड यांनी खोचक शब्द टोला लगावला आहे. आव्हाड म्हणाले की, गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही, अशा शब्दात त्यांनी टोला लगावला. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आव्हाड म्हणाले की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार, 160 पेक्षा जास्त जागा येणार आहेत. बारामतीत युगेंद्र पवार येणार, एक मताने का होईना पण युगेंद्र आमदार होणार असल्याचा दावाही आव्हाड यांनी केला. दरम्यान, अपक्षांना भाजपकडून मोठी ऑफर दिली जात असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना ते म्हणाले की, भाजपकडे प्रचंड पैसा आहे, निवडणुकीत त्यांनी कोटींच्या कोटी वाटले, त्यामुळे आताही ते पैसे वाटणार, अपक्ष आमदारांना पैसे देणार, भाजपला अजून काय येतं? असा टोला त्यांनी लगावला.
![Rohit Patil News : अजितदादांचा फोन आला होता का? रोहित पाटील स्पष्टच बोलले..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/08/1548f4744cc90117c8b9bc2e4d2d356d1733663608121976_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)