ऊसतोड कामगारांच्या बैठकीसाठी मंत्री धनंजय मुंडेंनाही बोलवून जबाबदारी निश्चित करण्याची पंकजा मुंडेंची मागणी
ऊसतोड कामगारांच्या बैठकीसाठी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनाही बोलवून जबाबदारी निश्चित करण्याची मागणी भाजपच्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी केली आहे.उसतोड कामागारांच्या प्रश्नावर खासदार शरद पवार यांनीही मार्गदर्शन करावे : पंकजा मुंडे
बीड : ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी कमिटीने मंत्री धनंजय मुंडे यांनाही बैठकीला बोलवावे व जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पंकजा मुंडेंनी आज झालेल्या साखर संघाच्या बैठकीत केली आहे. पंकजा मुंडे या बैठकीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाल्या होत्या. ऊसतोड कामगारांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा ऊसतोड कामगारांचा कोयता चालणार नाही, असा इशाराही पंकजा मुंडे यांनी दिलाय.
राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्या संचालक मंडळाची बैठक आज साखर भवनात पार पडली. या बैठकीत राज्यात सुरु असलेल्या ऊसतोड कामगारांच्या संपातील मागण्यांवर चर्चा झाली. याशिवाय ऊसतोड कामगारांसाठी राबविण्यात येणाऱ्या योजना आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्या बैठकीला धनंजय मुंडे यांनाही बोलावून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्याची मागणी पंकजा मुंडे यांनी या बैठकीत केली आहे.
मराठा आरक्षण स्थगिती विरोधात आज सोलापूर बंदची हाक; आंदोलकांकडून रस्त्यावर टायरची जाळपोळ
या सोबतच आरोग्यमंत्री राजेश टोपे, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, महिला बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनाही आमंत्रित करावे व अंतिम निर्णय लवादाने घ्यावा अशा सूचना साखर संघाच्या बैठकीत पंकजा मुंडेंनी केल्या.
पंकजा मुंडे यांनी केलेल्या मागण्या..
राज्यातील तमाम ऊसतोड मजुरांच्या मजुरीच्या दरात वाढ मिळावी आणि ही वाढ सन्मानजनकच मिळाली पाहिजे. त्यासाठीचा करार हा तीन वर्षाचाच होईल.
ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा कोयता चालणार नाही!!! करार 3 वर्षाचाच होईल .. covid च्या धरतीवर मजुरांना विमा कवच द्या सरकारने व कारखान्याने ही जवाबदारी घ्यावी.. (१/२)
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांना विमा कवच द्यावे, त्याची जबाबदारी राज्य सरकार व कारखान्यांनी घ्यावी.
सरकारी पातळीवर असलेल्या विषयावर चर्चा करण्यासाठी एक समिती आणि भाववाढ व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केले जाणारे सुरक्षेचे उपाय यावर चर्चा करणारी दुसरी समिती अशा दोन समित्या साखर संघाने स्थापन कराव्यात व त्या दोन्ही समितीचे अध्यक्ष साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर असावेत.
ऊसतोड कामगार महामंडळा कडे असणारे विषय हाताळण्यासाठी धनंजय मुंडे ना ही बैठकी ला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर आणखी मंत्री महोदय उदा.आरोग्य मंत्री, कामगार मंत्री, महिला व बाल कल्याण यांना ही बोलवावे.. (१/२)
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
या दोन्ही समितीने त्यांचे म्हणणे लवादासमोर मांडावे व चर्चा करावी. या विषयाबाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खासदार शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे.
लवादाच्या बाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खा.शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे.. संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही.. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत..
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 21, 2020
संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे. कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. ऊसतोड कामगारांच्या संपात काहीजण विनाकारण हास्तक्षेप करत आहेत. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत असे मत या वेळी पंकजा मुंडे नि व्यक्त केलंय.
Prashna Maharashtrache | कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार कमी पडतंय : पंकजा मुंडे