एक्स्प्लोर
पालघरमध्ये दोन बाईक एकमेकांवर धडकल्या, तरुणाचा जागीच मृत्यू
हेल्मेट न घातल्यामुळे अपघातात बाईकस्वार तरुणाला प्राण गमवावे लागले.
पालघर : पालघरमध्ये दोन बाईकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले आहेत. हेल्मेट न घातल्यामुळे बाईकस्वार तरुणाला प्राण गमवावे लागले.
पालघर जिल्ह्यातील वरई-सफाळे मार्गावर दोन बाईक एकमेकांवर आदळून अपघात झाला. यामध्ये 25 वर्षीय अक्षय भरत पाटीलचा मृत्यू झाला. अक्षय हा गिराळे गावातील रहिवासी होता. सफाळे–वरई मार्गावरील तांदुळवाडी घाटात बुधवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सफाळ्याहून बाईकने घरी परतत असताना तांदुळवाडी घाटातील नागमोडी वळणावर अक्षयच्या बाईकला विरुद्ध दिशेने येणाऱ्या बाईकची जोरदार टक्कर बसली. त्यामुळे अक्षय बसवर जाऊन आदळला.
अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे अक्षयचा जागीच मृत्यू झाला. अपघातावेळी त्याने हेल्मेट घातलं नव्हतं. हेल्मेट घातलं असतं, तर त्याचा प्राण वाचला असता, असं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement