एक्स्प्लोर
'क्लिप खरी असेल तर फडणवीसांचा राजीनामा घ्या, खोटी असल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाई करा'
निवडणूक आयोगाने याप्रकरणाची तात्काळ चौकशी करुन कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. क्लिप खोटी असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
!['क्लिप खरी असेल तर फडणवीसांचा राजीनामा घ्या, खोटी असल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाई करा' Palghar bypoll 2018, cm devendra fadnavis audio clip : Congress demands step down fadnavis 'क्लिप खरी असेल तर फडणवीसांचा राजीनामा घ्या, खोटी असल्यास उद्धव ठाकरेंवर कारवाई करा'](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/12172314/Ashok_Chavan.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर: पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतील ऑडिओ क्लिपबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली.
निवडणूक आयोगाने याप्रकरणाची तात्काळ चौकशी करुन कारवाई करावी. क्लिप खरी असेल तर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा. क्लिप खोटी असेल तर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, असंही अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.
पालघर : शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्याला पकडलं, भाजपवर आरोप
त्यामुळे पालघर लोकसभा पोटनिवडणूक जिंकण्यासाठी भाजपने साम दाम दंड भेद वापरल्याचा आरोप अधिक गडद होत आहे. पैसे वाटपाच्या आरोपानंतर, आता मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप लीक झाली आहे.
मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लिप
पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आतापर्यंतचा सर्वात गंभीर आरोप समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पालघरमधल्या कार्यकर्त्यांना साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या गोष्टींचा वापर करण्याचा सल्ला दिल्याचा दावा खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
पालघरमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या भरसभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची ऑडिओ क्लिप जगजाहीर केली. हे संभाषण मुख्यमंत्री आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.
या ऑडिओ क्लिपची निवडणूक आयोगाने तातडीने दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी या सभेमध्ये केली.
काय आहे ही फडणवीसांची कथित ऑडिओ क्लीप?
एक प्रचंड मोठी लढाई आपल्याला लढायची आहे. आपल्या अस्तित्वाला जर कोणी त्या ठिकाणी आव्हान देत असेल आणि आपल्याशी विश्वासघात करत असेल, एखादा पक्ष आपला मित्र म्हणता म्हणता... आपल्या पाठीत खंजीर खुपसत असेल, तर आपण कशाप्रकारे रिअॅक्ट केलं पाहिजे?
ज्याच्या रक्तामध्ये भाजप आहे, तो आता शांत बसूच शकत नाही
आता एवढा मोठा अटॅक आपण केला पाहिजे की भाजप काय आहे हे त्यांना लक्षात आलं पाहिजे
ज्यावेळी मी सांगतो तेव्हा हे लक्षात ठेवा...
साम, दाम, दंड, भेद...
ही निवडणूक जर जिंकायची असेल तर जशास तसं उत्तर दिलं पाहिजे. कुणाची दादागिरी मी चालू देणार नाही.
कुणी दादागिरी करायचा प्रयत्न केला तर त्यापेक्षा जास्त मोठी दादागिरी मला करता येते, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे.
तेव्हा तुमच्या पाठीशी ताकदीनं आणि खंबीरपणे मी उभा आहे.
'अरे ला कारे'च करायचं..
'अरे ला कारे' मध्येच उत्तर द्यायचं हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे
भाजपची प्रतिक्रिया
पराभव समोर दिसू लागल्यामुळे सैरभैर झालेल्या शिवसेनेकडून अर्धवट आणि एडिट केलेली ऑडिओ क्लिप दाखवली जात आहे. या संदर्भात आज निवडणूक आयोगाकडे भाजप तक्रार करणार आहेच, पण त्याबरोबर खरी क्लिपही जाहीर करू, अशी प्रतिक्रिया भाजप नेते गिरीश महाजन यांनी दिली.
ऑडिओ क्लिप
संबंधित बातम्या
पालघर : शिवसैनिकांनी पैसे वाटणाऱ्याला पकडलं, भाजपवर आरोप
उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांची कथित ऑडिओ क्लीप सादर
पालघर पैसे वाटप: सेनेचे दिग्गज नेते रात्री 2 वा. डहाणू पोलिसात
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
बीड
बीड
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)