पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या तिघांचे डोंबिवलीत स्मृतीस्थळ उभारणार, 4 मे रोजी अधिकृत घोषणा करणार
जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) डोंबिवलीतील (Dombivli) तीन सुपुत्रांचा मृत्यू झाला आहे. या तिघांचेही डोंबिवलीत स्मृतीस्थळ होणार आहे.

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात (Pahalgam Terror Attack) डोंबिवलीतील (Dombivli) तीन सुपुत्रांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अतुल मोने, संजय लेले, हेमंत जोशी यांचा मृत्यू झाला आहे. या तिघांच्या मृत्यूची आठवण म्हणून त्यांचे स्मृतीस्थळ डोंबिवली पश्चिम येथील भाग शाळा मैदानमध्ये उभारण्याची प्रकिया सुरु आहे. 4 मे रोजी या स्मृतीस्थळाची घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती कल्याण डोंबिवली मनपा शहर अभियंता यांनी दिली आहे.
महानगरपालिकेने तातडीने ठराव तयार करुन मंजूर प्रक्रियेमध्ये ठेवला आहे
आमदार रवींद्र चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पत्र व्यवहार करून कश्मीरमध्ये मृत झालेल्या तिघांची स्मृती स्थळ उभारण्यासाठी मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने तातडीने ठराव तयार करुन मंजूर प्रक्रियेमध्ये ठेवला आहे. येत्या चार मे पर्यंत ठराव मंजूर करण्यात येणार असून त्याची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता यांनी दिली आहे.
दहशतवाद्यांनी कुटुंबासमोर गोळ्या घालून केली तिघांची हत्या
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दहशतवाद्यांनी संजय लेले, हेमंत जोशी आणि अतुल मोने यांची त्यांच्या कुटुंबासमोर गोळ्या घालून हत्या केली होती. या घटनेनंतर डोंबिवलीकरांनी हळहळ व्यक्त केली होती. या तिन्ही कुटुंबाचा मित्रपरिवार या हत्येचा बदला घेण्याची मागणी सरकारकडे करत आहे. आमच्या हातात बंदूक द्या आम्ही त्यांना गोळ्या घालू अशा तीव्र भावना या तिन्ही कुटुंबाच्या मित्र परिवाराने व्यक्त केल्या आहेत.
दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा मृत्यू
22 एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन खोऱ्यात पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 निष्पाप लोकांचा निर्घृणपणे बळी गेला होता. 2019 मध्ये पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा या भागातील सर्वात प्राणघातक हल्ला मानला जात आहे. भारत सरकार आणि भारतीय सशस्त्र दलांनी या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शत्रूंना स्पष्ट संदेश दिला आहे की आता दहशतवादाविरोधातील कारवाई कोणत्याही स्तरावर मर्यादित राहणार नाही. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terror Attack) भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत आहे. भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर सर्व सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हालचालींना वेग आला आहे. भारतीय नौदलाची जहाजे दीर्घ पल्ल्याच्या अचूक हल्ल्यासाठी त्यांच्या क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्र प्रणालीची सतत चाचणी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या:
























