एक्स्प्लोर
आटलेल्या बोअरवेलमधून 20 फूट पाणी आपोआप उसळलं
उस्मानाबादेतील आरणी या गावात पावसामुळे आटलेल्या बोअरवेलमधून 20 फूट उंच पाणी वर उडालं
उस्मानाबाद: मुसळधार पावसानंतर मराठवाड्यातून यंदाचा दुष्काळ कसा धुतला गेला हे सांगणारं दृश्यं समोर आलं आहे.
पावसामुळे भूगर्भातली पातळी मोठ्या प्रमाणात वाढल्यानं, अनेक आटलेल्या बोअरवेल मधून पाणी वर येऊ लागलं आहे. उस्मानाबादच्या आरणी गावातील एका शेतात असाच प्रकार घडला. बोअरवेलमधून कोणत्याही पंपशिवाय पाणी 15 ते 20 फूट उंच उडालं.
आरणी गाव हे तेरणा नदीजवळ आहे. उन्हाळ्यात पाण्याचा अतिरिक्त उपसा झाल्याने भूगर्भात पोकळी निर्माण होते. महाराष्ट्रात आणि विशेषत: मराठवाड्यात उन्हाळ्यात पाण्याचा उपसा जास्त असतो.
अतिरिक्त पाऊस जेव्हा होतो, तेव्हा भूगर्भातील खडकाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता संपलेली असते. त्यावेळी पाणी जमिनीवर येतं. जिथे जिथे पोकळी मिळेल, तिथून हे पाणी भूपृष्ठावर येतं.
आरणी गावातील ज्या बोअरवेलमधून पाणी आलं, तिथे ही पोकळी निर्माण झाली असावी, त्यामुळेत हे पाणी वर उडाल्याचा अंदाज आहे. या ओबरवेलला 3HP चा पंप होता, पण पावसामुळे कोणत्याही पंपाशिवाय जवळपास 15 ते 20 फूट उंच उडालं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement