(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पावसाच्या धास्तीनं चाळणीला ठेवलेला कांदा मार्केटयार्डात! 24 तासांत 57 हजार 700 क्विंटलचा लिलाव, काय मिळाला भाव?
चाळणीला ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी नासण्याच्या भीतीने बाजारात आणल्याचे दिसले. शिवाय चांगला दर असल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली.
Onion Marketyard: तामिळनाडूतील फेंगल चक्रीवादळाने राज्यात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केल्याने महाराष्ट्रातले शेतकरी धास्तावले आहेत. पावसाच्या शक्यतेनंतर रविवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही ठिकाणी हलक्या सरींचा शिडकावाही झाला. परिणामी कर्नाटक आणि मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात मार्केटयार्डात कांदा आला होता. रविवारी बाजार समितीला सुट्टी असली तरी सोमवारी पहाट होण्यापूर्वीच सोलापूर बाजार समितीच्या आवारात ५८७ ट्रक कांदा आला होता. ५८ हजार ७०८ क्विंटल कांद्याचा सोमवारी सकाळी लिलाव झाला. क्विंटलला किमान ५०० ते कमाल ७ हजार रुपयांचा दर मिळाला.
कांदा नासेल या भीतीने मार्केटयार्डाबाहेर वाहनांची रीघ
चाळणीला ठेवलेला कांदा शेतकऱ्यांनी नासण्याच्या भीतीने बाजारात आणल्याचे दिसले. शिवाय चांगला दर असल्याने मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाली. रविवारी बाजार समितीला सुटी होती. तरीदेखील सोलापूर बाजार समितीच्या मार्केट यार्डात रात्रीच काही वाहने येऊन धडकली होती. सोमवारी पहाटे तर वाहनांची रीघ लागल्याचे चित्र होते. सोमवारी सकाळीच कांद्याचे लिलाव झाले व त्यानंतर वाहने बाहेर पडण्यास सुरुवात झाली. एकामागून एक वाहन बाहेर येत असल्याने हैदराबाद रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली होती. वाहतूक पोलिस आणि बाजार समितीच्या सुरक्षा रक्षकांनी रस्ता करून दिल्याने ही वाहतूक कोंडी फुटली.
काय भाव मिळाला?
सोमवारी ५८७ गाड्यांतून आला मार्केट यार्डात कांदा आला. ३०० गाडया भरून कांदा आवक सरासरी गेल्या आठवडपात होती. शेतकऱ्यांना १००० हजार ते ५००० हजार रुपये मिळाले. जुन्या कांद्याला साधारण ५००० हजार रुपये भाव मिळाला होता. सोमवारी मराठवाडा आणि शेजारच्या कर्नाटकातून कांदा मोठ्या प्रमाणात सोलापुरात आला आहे. आगामी काही दिवसात अजून कांद्याची आवक होण्याची शक्यता आहे. सोमवारी लाल कांद्याला सोलापूर बाजारात 2600 रुपये, बारामती बाजारात 5000 रुपये, येवला बाजारात 2900 रुपये, लासलगाव विंचूर बाजारात 3800 रुपये तर देवळा बाजारात 3500 रुपये दर मिळाला.
तापमानात चढउतार