सीट बेल्ट काढताना गाडीचा ताबा सुटला, एकाचा मृत्यू तर तिघे जखमी
पुणे-बंगळुरु महामार्गावर होनगा येथे कंटेनर आणि मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत.

बेळगाव : पुणे-बंगळुरु महामार्गावर होनगा येथे कंटेनर आणि मारुती व्हॅनमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. सीट बेल्ट काढताना मारुती व्हॅन चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला.
ताबा सुटल्यानंतर गाडी रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला जाऊन धडकली. जावेद हुसेन मुश्रीफ (वय 55 वर्ष) यांचा या अपघातात मृत्यू झाला. मृत जावेद मुश्रीफ आजारी असलेल्या लहान भेटण्यासाठी बेळगावला निघाले होते. मात्र बेळगावच्या १० किमी आधीच त्यांचा अपघात झाला आणि नियतीने त्यांच्या भावाची भेट घडू दिली नाही.
गाडी वेगात असल्याने धडक जोरदार झाली. यामध्ये गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला. सबाबी मुश्रीफ, आरिफ अल्ताफ मुश्रीफ, सफिजा मुश्रीफ हे या अपघातात जखमी झाले आहेत. जखमींवर बेळगावातील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
