एक्स्प्लोर

28 February In History: प्रयाग कुंभ चेंगराचेंगरीत 500 लोकांचा मृत्यू, भारताने चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला

On This Day In History : प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री वहिदा रहमान यांचा आजच्या दिवशी, 3 फेब्रुवारी 1938 रोजी जन्म झाला. त्यांनी आपल्या अभिनयाने बॉलिवूडवर वेगळीच छाप उमटवलीय. 

मुंबई: आजचा दिवस हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. या दिवशी, 3 फेब्रुवारी 2018 रोजी भारताने चौथ्यांदा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकला. पण याच दिवशी एक दु:खद घटनाही घडली होती. 1954 मध्ये प्रयाग कुंभ येथे झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 500 लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. याचसोबत इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडल्या ते जाणून घेऊया. 

1509: दीवची लढाई

3 फेब्रुवारी 1509 रोजी दीवची लढाई झाली. त्याला चौलची दुसरी लढाई असेही म्हणतात.

1760: मराठा सैन्याने निजामाचा पराभव केला

आजच्याच दिवशी, 3 फेब्रुवारी 1760 रोजी सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने उदगीरच्या लढाईत निजामाच्या सैन्याचा पराभव केला.

1916- बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना (Banaras Hindu University) 

बनारसमधील बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) या विद्यापीठाची स्थापना 3 फेब्रुवारी 1916 रोजी झाली. स्वातंत्र्यसेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांनी वसंत पंचमीच्या दिवशी या विद्यापीठाची स्थापना केली. डॉ. अॅनी बेझंट या विद्यापीठाच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली. या  विद्यापीठाला राष्ट्रीय महत्त्वाच्या संस्थेचा दर्जा प्राप्त झाला आहे.

1925: पहिली इलेक्ट्रिक ट्रेन बॉम्बे ते कुर्ला दरम्यान धावली (1st Electric Train) 

देशातील पहिली इलेक्ट्रिक ट्रेन बॉम्बे ते कुर्ला या दरम्यान धावली. त्याआधी मुंबईतच 1853 साली देशातील पहिली रेल्वे धावली होती. 

1938: वहिदा रहमान यांचा जन्म (Waheeda Rehman) 

प्रसिद्ध भारतीय चित्रपट अभिनेत्री वहिदा रहमान यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1938 रोजी झाला. वहिदा रेहमान या एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहेत. त्यांनी प्रामुख्याने हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. तसेच त्यांनी तेलुगू, तमिळ आणि बंगाली चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 1950, 1960 आणि 1970 च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांना विविध शैलीतील चित्रपटांमधील योगदानासाठी ओळखले जाते. वहिदा रेहमान यांच्या संपूर्ण कारकिर्दीत, फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दोन फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.

1954-  प्रयाग कुंभ चेंगराचेंगरीमुळे 500 लोकांचा मृत्यू (Allahabad Kumbh Mela) 

आजच्या दिवशी इतिहासात, 14 फेब्रुवारी 1954 रोजी अलाहाबादमध्ये प्रयाग कुंभ दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत 500 लोकांचा मृत्यू झाला होता. कोट्यवधी लोकांना संगमाकडे खेचणाऱ्या या श्रद्धेच्या पवित्र सणावर घडलेल्या या अप्रिय घटनेने देशभर दु:ख व्यक्त करण्यात आलं. या घटनेनंतर कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या व्यवस्थेत आणि जत्रेच्या स्वरूपामध्ये व्यापक बदल करण्यात आले.

1963: रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जन्म (Raghuram Rajan) 

रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1963 रोजी झाला. रघुराम राजन हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे 23 वे गव्हर्नर होते. 4 सप्टेंबर 2013 रोजी डी. सुब्बाराव यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी हे पद स्वीकारले. त्याआधी ते तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे प्रमुख आर्थिक सल्लागार होते. रघुराम राजन यांनी एरिक जे. बूथ स्कूल ऑफ बिझनेस शिकागो विद्यापीठात प्रोफेसरचं काम केलं. त्यांनी भारतीय अर्थ मंत्रालय, जागतिक बँक, फेडरल रिझर्व्ह बोर्ड आणि स्वीडिश संसदीय आयोगाचे सल्लागार म्हणूनही काम केले आहे. 2011 मध्ये ते अमेरिकन फायनान्स असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि सध्या ते अमेरिकन अॅकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेसचे सदस्य आहेत.

1969: सी एन अन्नादुराई यांचे निधन (C. N. Annadurai)

कांजीवरम नटराजन अन्नादुराई हे तमिळनाडूतील लोकप्रिय राजकारणी होते. तामिळनाडूचे ते पहिले बिगर-काँग्रेस मुख्यमंत्री आणि द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे संस्थापक होते. त्यांना अण्णा म्हणजे तमिळमध्ये मोठा भाऊ म्हणून ओळखलं जायचं. त्यांचा जन्म 3 फेब्रुवारी 1969 रोजी अतिशय साध्या कुटुंबात झाला. आधुनिक तमिळनाडूचे जनक असंही त्यांची ओळख आहे. 

1971: अमेरिकेचे अंतराळयान अपोलो चंद्रावर उतरले (Apolo 14) 

चंद्रावरील तिसऱ्या यशस्वी मानव मोहिमेदरम्यान अमेरिकेचे अंतराळयान अपोलो 14 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले.

1988: INS चक्र पाणबुडीचा नौदलात समावेश (INS Chakra) 

INS चक्र ही पहिली आण्विक शक्ती असलेली पाणबुडी भारतीय नौदलात सामील झाली.

2006- इजिप्तमध्ये बोट बुडाली, हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू

2006 साली 3 फेब्रुवारीलाच इजिप्तमधील एक प्रवासी बोट तांबड्या समुद्रात बुडाल्याने हजाराहून अधिक लोकांना जीव गमवावा लागला होता.

2018- भारताने चौथ्यांदा अंडर-19 विश्वचषक जिंकला (Team India) 

3 फेब्रुवारी हा दिवस भारतीय क्रिकेटसाठी एक संस्मरणीय दिवस होता. या दिवशी भारताने चौथ्यांदा अंडर-19 क्रिकेट विश्वचषक जिंकला. 3 फेब्रुवारी 2018 रोजी न्यूझीलंडच्या ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या या अंतिम सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाच्या बलाढ्य संघाचा आठ गडी राखून पराभव केला. भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन संघाला 216 धावांत गुंडाळून फलंदाजांचे काम सोपे केले आणि त्यानंतर मनजोत कालरा याने 102 धावांची शानदार खेळी खेळून आपल्या संघाला विक्रमी चौथ्या विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले.

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Jammu-kashmir Vidhansabha Rada :  ठरावाची प्रत फाडली, जम्मू-काश्मीर   विधानसभेत  कलम 370वरून राडाABP Majha Marathi News Headlines 11AM TOP Headlines 11 AM 07 November 2024Uddhav Thackeray Manifesto : उद्धव ठाकरेंकडून वचननामा जाहीर, महाराष्ट्राला वचन काय?Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: 'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'मला एकटा पाडण्याचा अन् राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न मात्र...',अजित पवारांच्या टीकेला हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही; चंद्रशेखर बावनकुळेंची खोचक टीका
Jammu & Kashmir : कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
कलम 370 वरुन जम्मू आणि काश्मीर विधानसभेत राडा सुरुच; आमदारांची एकमेकांना धक्काबुक्की, काॅलर पकडून तुंबळ हाणामारी
Sarangi Mahajan: प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे, पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप, म्हणाल्या, भावा-बहिणीने आमची जमीन हडपली
Sunil Tatkare : सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
सुनील तटकरे मुस्लिम कार्यकर्त्यांना म्हणाले, 'लोकसभेला मला फसवलं, तसं यावेळी करू नका'
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sadabhau Khot on Sharad Pawar : पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरुन सदाभाऊ खोतांची दिलगिरी
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
देवेंद्र फडणवीसांनी सदाभाऊ खोतांना थोबाडायला पाहिजे होतं, पण ते फिदीफिदी हसत होते : संजय राऊत
Prakash Abitkar on K P Patil : केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
केपींनी 10 वर्षात केलेली 10 विकासकामे आठवून सांगावीत अन् मते मागा; प्रकाश आबिटकरांचा हल्लाबोल
Embed widget