Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंच्या 3 योजना बंद करण्याचा विचार; महत्वाच्या समितीतूनही वगळलं, महायुतीमध्ये काय घडतंय?
Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रिपदी असताना सुरु केलेल्या लोकप्रिय योजना थांबवण्याचा विचार फडणवीस सरकारकडून केला जात आहे.

Maharashtra Politics मुंबई: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सुरु केलेल्या लोकप्रिय योजना बंद करण्याचा विचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करत असल्याची माहिती समोर आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदेंनी तीर्थदर्शन योजनेची (Mukhyamantri Tirth Yatra Yojana Maharashtra) घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे.
'आनंदाचा शिधा'ही योजना देखील थांबवण्याचा फडणवीस सरकारचा विचार करत आहे. तिजोरीवर आर्थिक ताण वाढल्यानं मोफत योजना थांबवण्याचा विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 'शिवभोजन थाळी'योजनाही बंद करण्यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीमधूनही वगळण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारही आपत्ती व्यवस्थापन समितीमध्ये आहे. मात्र नगरविकास मंत्री असून एकनाथ शिंदेंना आपत्ती व्यवस्थापन समितीतून वगळले आहे. महसूल,मदत पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन व आरोग्यमंत्री समितीवर आहेत. मुंबईतल्या जुलै 2005 च्या महापुरानंतर आपत्ती व्यवस्थापनाची स्थापना करण्यात आली होती. त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं चाललंय तरी काय, असा प्रश्न उपस्थित केला जातोय.
प्रताप सरनाईक, सुधीर मुनगंटीवार काय म्हणाले?
मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना बिलकुल बंद होणार नाही ज्येष्ठांना त्याचा फायदा होत आहे. मीच या योजनेबाबत पुढाकार घेतला होता. मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी सुरू केलेली कुठलिही योजना बंद होणार नाही, असं मंत्री आणि शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक म्हणाले. तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या समितीत काय झालं हे माहित नाही, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तर कुठे गैरव्यवहार होत असतील कोणतीही भोजनाची थाळी न देता अनुदान काढले जात असतील, तिथं हा प्रश्न आहे. योजना बंद केल्या जाणार असं मला वाटत नाही. या योजनेसाठी 126 कोटी दरवर्षी खर्च होतात. ही योजना बंद करून मोठं काय होणार असं काही नाही. पैशांचा योग्य उपयोग झाला पाहिजे. हा जनतेचा पैसा आहे, असं भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
शिवसनेच्या मंत्र्यांचा नाराजीचा सूर कायम-
महायुतीमधील शिवसनेच्या मंत्र्यांचा नाराजीचा सूर कायम आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्वतःच्याच उद्योग खात्यातील प्रधान सचिव आणि सीईओ यांच्याजवळ नाराजी व्यक्त करत पत्र लिहिले. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात तसेच उद्योग विभागाची काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय परस्पर प्रशासकीय पातळीवर घेत असल्याबाबत नाराजी पत्रात व्यक्त केली आहे. धोरणात्मक निर्णय, महत्त्वाचे कामकाजाबाबत आणि कामकाजाविषयी सचिव उद्योग तसेच मुख्याधिकारी, कार्यकारी अधिकारी यांनी नियमित ब्रिफिंग करावी. याची दक्षता घ्यावी असा सज्जड दम देखील पत्राद्वारे भरला आहे.
एकनाथ शिंदेंच्या 3 योजना बंद करण्याचा विचार, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
