Omicron Variant : राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी आठ रुग्णांची नोंद, मुंबईत सात तर वसई-विरारमध्येही एक नवा रुग्ण
Omicron Case in Mumbai : राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी आठ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सात तर वसई विरारमध्ये एक नवा रुग्ण आढळला आहे.
नवी दिल्ली : संपूर्ण जगामध्ये सध्या कोरोनाच्या ओमायक्रोन (Omicron) विषाणूचा धुमाकूळ सुरू आहे. राज्यातील ओमायक्रॉन बाधित रुग्णाच्या संख्येत दररोज वाढ होताना दिसत आहे. राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी आठ रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत सात तर वसई विरारमध्ये एक नवा रुग्ण आढळला आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. राज्यात आत्तापर्यंत 28 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
आज आढळलेल्या आठ ओमायक्रॉनबाधित रुग्णांपैकी दोन रुग्ण रुग्णालयात आणि सहा जण घरी विलगीकरणात आहेत. या आठ रुग्णांपैकी तीन महिला आणि पाच पुरुष आहे. विदेशातून आलेल्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे. ओमायक्रॉनबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध सुरु आहे. सर्वांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसेच त्यांना विलगीकरणातही ठेवण्यात येईल.
राज्यात ओमायक्रॉनचे 28 रुग्ण
राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार मुंबईत सात तर वसई विरारमध्ये एक ओमायक्रॉन बाधित आढळलेला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण ओमायक्रॉनबाधित रुग्णाची संख्या 28 इतकी झाली आहे. यामध्ये मुंबईत 12, पिंपरी चिंचवडमध्ये 10, पुणे मनपामध्ये दोन, कल्याण डोंबिवली, नागपूर, लातूर, वसई-विरारमध्ये एक रुग्ण आढळले आहेत. 28 पैकी 9 रुग्णांनी ओमायक्रॉनवर मात केली आहे. नऊ रुग्णांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. त्यापैकी 9 जणांना रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
देशात ओमायक्रॉनचे 45 रुग्ण
दिल्लीत चार ओमायक्रॉन बाधित आढळल्यानंतर आता देशातील ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. सोमवारी महाराष्ट्रात आणखी दोन जणांना कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटची लागण झाल्याचे आढळून आले. दोघेही दुबईला गेले होते. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिकेतून गुजरातला परतलेल्या एका व्यक्तीला ओमिक्रॉनची लागण झाल्याचे आढळून आले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
इतर बातम्या :