एक्स्प्लोर

पंकजा मुंडेंच्या कारखान्याचा परवाना रद्द करणारा अधिकारी निलंबित

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात गेल्या वर्षी स्फोट होऊन 7 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 10 कामगार गंभीर जखमी होते. कारखान्यातील त्रुटींमुळे हा अपघात झाल्याचा ठपका वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ठेवला होता.

मुंबई: साखर कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे कामगारांना जीव गमवावा लागल्याने, कारवाई करणाऱ्या एफडीएच्या सहाय्यक आयुक्तांचंच निलंबन करण्यात आलं आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या कारखान्यावर कारवाई झाली होती, तो कारखाना ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आहे. या कारखान्याचा परवाना रद्द करणाऱ्या अधिकाऱ्याचं निलंबन तर केलंच, पण कारखान्याचा परवानाही पूर्ववत केला. या कारखान्यात गेल्या वर्षी स्फोट होऊन 7 कामगारांचा मृत्यू झाला होता, तर 10 कामगार गंभीर जखमी होते. कारखान्यातील त्रुटींमुळे हा अपघात झाल्याचा ठपका वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर ठेवला होता. काय आहे संपूर्ण प्रकरण? बीडमधील परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यात 8 डिसेंबर 2017 रोजी रसाच्या टाकीचा स्फोट झाला होता. या स्फोटात 7 कामगारांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारखान्याचा परवाना निलंबित करण्यात आला होता. इतकंच नाही तर अन्न आणि औषध प्रशासनानं यासंदर्भात कारखान्याला नोटीस बजावली होती. तपासणीदरम्यान या कारखान्यात अनेक त्रुटी आढळून आल्या होत्या. तसंच, जीएमपी म्हणजेच गुडस् मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टीसेसच्या नियमावलीचं उल्लंघन झाल्याचं आढळून आलं होतं. त्यामुळे, अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त अभिमन्यू केरुरे यांनी या कारखान्याची तपासणी करुन परवाना रद्द केला होता. मात्र, या कारखान्याला परवाना देण्याचे काम एफडीएच्या अधिकारक्षेत्रात येत नाही. त्यामुळे केरुरेंनी अधिकाराचा गैरवापर केला, असं कारण देत एफडीएनं त्यांच्यावर तात्काळ सेवेतून निलंबित करण्याची कारवाई केली. इतकंच नाही तर पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावरील कारवाईसुद्धा मागे घेण्यात आली.कारखान्याचा रद्द झालेला परवाना पुन्हा बहाल करण्यात आला. मात्र प्रश्न हा आहे की अधिकारक्षेत्र कोणाचंही असलं, तरी ज्या त्रुटी आढळल्या आहेत, नियमांची पायमल्ली केल्याचं निदर्शनास आलं आहे त्याचं काय? ज्या चुकांमुळे 7 कामगारांना जीव गमवावा लागला त्याप्रकरणी कोणावर कारवाई करायची? अधिकारक्षेत्र बदललं तर त्रुटी बदलणार आहेत का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात. सर्वच सहकारी कारखाने सहकार निबंधकांच्या अखत्यारित येतात. घटनेला वर्ष होत आलं, मात्र एफडीएच्या पाहणी अहवालावर सहकार निबंधकांनी काय कारवाई केली? तांत्रिक त्रुटी शोधून एफडीएच्या अधिकाऱ्यांचं निलंबन केलं, पण या अधिकाऱ्याने ज्या कारखान्याच्या त्रुटी शोधल्या त्या दुरुस्त झाल्या का? असे प्रश्न आहेत. संबंधित बातम्या  वैद्यनाथ कारखाना दुर्घटनेनंतर गोपीनाथ मुंडेंच्या जयंतीचा कार्यक्रम रद्द   पंकजा मुंडेंच्या कारखान्यात जाण्यापासून धनंजय मुंडेंना रोखलं   वैद्यनाथ कारखाना दुर्घटना, मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी सहा लाखांची मदत 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 27 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सVijay Wadettiwar : ... तर ST भाडेवाढ तात्काळ मागे घेत जनतेला दिलासा द्यावा९ सेकंदात बातमी Top 90 at 9AM Superfast 27 January 2025 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 27 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Guillain Barre Syndrome: पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचं थैमान; एकाच दिवसात 28 नव्या रुग्णांची नोंद, 16 रुग्ण व्हेंटीलेटरवर
Sharad Pawar Camp: सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
सोलापूरमध्ये शरद पवार गटाला मोठा झटका, 'हा' बडा ओबीसी नेता शिंदे गटाच्या वाटेवर
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
एकीकडे महायुती सरकारकडून कोट्यवधींच्या बाता, दुसरीकडे खरेदी केंद्रावरील प्रतीक्षेमुळे सोयाबीन शेतकऱ्यांचा प्राण डोळ्यात आला
Pradosh Vrat 2025 : एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
एकवेळ उपाशी राहा, पण प्रदोष व्रतात चुकूनही करू नका 'ही' कामं; कोसळेल संकटांचा डोंगर
Vijay Wadettiwar on ST Fair Hike : एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
एसटी दरवाढ मंत्र्यांनी केली नाही मग केली कोणी, हे खाते चालवते कोण? विजय वडेट्टीवारांचा महायुती सरकारवर घणाघाती प्रहार
Masik Shivratri 2025 : आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
आज वर्षातील पहिल्या मासिक शिवरात्रीला करा 'हे' छोटे उपाय; क्षणात उघडेल निद्रीस्त भाग्य, सुख-संपत्तीत होईल अपार वाढ
Orange Growers Compensation : सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
सततच्या पावसाने नुकसान झालेल्या विदर्भातील संत्रा उत्पादकांना तब्बल 165 कोटींची नुकसान भरपाई जाहीर; मात्र, नागपूरला दीड दमडी सुद्धा नाही!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतानंतर आता बांगलादेशवर सर्जिकल स्ट्राईक! एका झटक्यात अंतरिम सरकारच्या नाड्या आवळल्या
Embed widget