एक्स्प्लोर

OBC Reservation Live Updates : ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला, पाहा प्रत्येक अपडेट्स...

OBC Reservation Live Updates : ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

LIVE

Key Events
OBC Reservation Live Updates : ओबीसी आरक्षणाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला, पाहा प्रत्येक अपडेट्स...

Background

ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सर्वोच्च न्यायालयानं नाकारला आहे. महाराष्ट्र सरकारला हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे. 

Supreme Court OBC Reservation : देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने नाकारला आहे. राजकीय प्रतिनिधित्वाची योग्य आकडेवारी रिपोर्टमध्ये नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. जोपर्यंत पुढचे निर्देश देत नाही तोपर्यंत ओबीसी आरक्षणासह निवडणुका होणार नाही, असे स्पष्ट आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. 

सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?

राज्य मागासवर्गाच्या अहवालात ओबीसींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. त्याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय ओबीसी प्रतिनिधीत्वाची माहिती अहवालात नव्हती. त्याशिवाय, कोणत्या कालावधीतील माहितीच्या आधारे हा अहवाल तयार केला याबाबतही कोणतीही स्पष्टता नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले. या पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पाडाव्यात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. पुढील निर्देश येईपर्यंत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्यात असेही सुप्रीम कोर्टाने म्हटले. 

या आधी सुप्रीम कोर्टाने काय म्हटले होते?

सर्वोच्च न्यायालयाने 17 डिसेंबर 2021 रोजी ओबीसी आरक्षणासाठीची त्रिसूत्री पार पाडल्याशिवाय राजकीय आरक्षण लागू करता येणार नाही असा आदेश दिला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या 105 नगर पंचायतींच्या निवडणुकाही दोन टप्प्यांत पार पाडण्याची वेळ आली होती. आयोगाची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ओबीसीसाठी राखीव जागा या खुल्या प्रवर्गातल्या म्हणूनच गृहीत धरल्या जाव्यात असा आदेश कोर्टानं दिला होता. 

15:04 PM (IST)  •  03 Mar 2022

Pankaja Munde on OBC Reservation : ओबीसीच्या राजकीय आरक्षणाला 'धक्का' नसून 'धोका' मिळालाय : पंकजा मुंडे

13:25 PM (IST)  •  03 Mar 2022

Sadabhau Khot on OBC Reservation : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर तीव्र आंदोलन करू, आमदार सदाभाऊ खोत यांचा इशारा

आमदार सदाभाऊ खोत यांनी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणावर दिलेल्या निकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका झाल्या तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा आमदार सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. 

13:36 PM (IST)  •  03 Mar 2022

Gopichand Padalkar on OBC Reservation : हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात, पवारांच्या मनात जे आहे, तेच झालंय : गोपीचंद पडळकर

Gopichand Padalkar on OBC Reservation : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणावर दिलेल्या निकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "हे सरकार ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आहे.  पवार यांच्या मनात जे आहे ते झालं आहे. गरीब लोकांना न्याय मिळू नये ही भूमिका आहे. सरकारने इम्परिकल डाटा जमा केला नाही. वेळ काढूपणा केला त्याचा फटका बसला आहे." 

13:11 PM (IST)  •  03 Mar 2022

Vijay Wadettiwar Exclusive : काहीही झालं तरी OBC आरक्षणाशिवाय निवडणुका होऊ देणार नाही : ABP Majha

13:10 PM (IST)  •  03 Mar 2022

Nana Patole on OBC Reservation : भाजपला आरक्षण संपवायचंय त्याची सुरुवात ओबीसींपासून : नाना पटोले

Nana Patole on OBC Reservation : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षणावर दिलेल्या निकावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, "राज्य सरकारनं डेटा गोळा कडून सुप्रीम कोर्टाकडं दिला होता. त्यात कोणती कमतरता असेल, तर पुन्हा राज्याकडून पाठपुरावा केला जाईल. जो डाटा अपेक्षीत आहे, तो राज्याकडे नाहीच, केंद्राकडे आहे. भाजपला आरक्षण संपवायचंय त्याची सुरुवात ओबीसींपासून केलीय. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका होऊ नयेत, ही भूमीका असेल."

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 26 June 2024Nagesh Patil Ashtikar Lok Sabha Oath : बाळासाहेबांना स्मरुन शपथ, अध्यक्षांनी रोखलंRamesh Kir on Eknath Shinde : मी कोण हे मुख्यमंत्र्यांना हळूहळू कळेल, रमेश किर यांचा इशाराNilesh Lanke Oath : इंग्रजीत शपथ, निलेश लंकेंनी करुन दाखवलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
''बेट्या, तुझा टांगा उलटवणार'', मनोज जरांगेंचा भुजबळांना इशारा; मराठा-ओबीसी समाजाला महत्त्वाचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 25 जून 2024 | मंगळवार
Embed widget