एक्स्प्लोर

OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांच्या निवडणुकाचं काय? आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

महाराष्ट्रातील 92 नगरपालिकांच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी होणार आहे. अनेक दिवसांपासून या प्रकरणावरील सुनावणीला तारीख पे तारीख मिळत आहे.

OBC Reservation : राज्यातील 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी आरक्षण (OBC Reservation) लागू होणार की नाही याचा फैसला उद्या, गुरुवारी सुप्रीम कोर्टात होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भातलं प्रकरण आज सुप्रीम कोर्टात पहिल्या क्रमांकावर आहे. शिंदे सरकारने बदललेली प्रभाग रचना सुप्रीम कोर्ट मान्य करणार का? 92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण लागू होणार का? याकडे महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राज्यातील निवडणुका रखडलेल्या आहेत. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मात्र, या प्रकरणाच्या सुनावणीच्या तारखा सातत्यानं पुढे ढकलण्यात येत आहेत. 

92 नगरपरिषदांसाठी ओबीसी राजकीय आरक्षण, थेट नगराध्यक्ष पद्धत याबाबतचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. मागील 17 तारखेला यावर सुनावणी अपेक्षित होती. मात्र त्या दिवशी 28 नोव्हेंबर ही तारीख सुनावणीसाठी निश्चित करण्यात आली. 

महाराष्ट्रातील 92 नगर परिषदांच्या निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही, यावर सर्वोच्च न्यायालयात 23 ऑगस्ट रोजी सुनावणी झाली होती. यावेळी न्यायालयानं स्थिती जैसे थे ठेवत ओबीसी आरक्षणावरील सुनावणी 5 आठवड्यांनी पुढे ढकलली होती. सोबतच सुनावणीसाठी विशेष खंडपीठाची स्थापना करणार असल्याचंही न्यायालयानं स्पष्ट केलं होतं. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आधीच्या निर्णयाचं पुनर्विलोकन करावं तसेच राज्यातील 92 नगर परिषदांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करावं, अशी मागणी करणारी याचिका शिंदे-फडणवीस सरकारनं केली होती. त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने 367 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षण स्थगित ठेवण्याचा आदेश दिला होता.

ओबीसी आरक्षणासंदर्भातला निकाल 92 नगरपरिषदांसाठीही लागू करण्यात यावा या मागणीसाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. या 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू करण्यात आलं होतं. मग केवळ ओबीसी आरक्षण लागू न होणं हे अन्यायकारी ठरेल. ओबीसी आरक्षण लागू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं मुभा दिली. तोपर्यंत या नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी नोटिफिकेशन आलं नव्हतं, असा दावा सरकारच्या वतीनं करण्यात आला होता.  राज्य सरकारचं म्हणणं होतं की, ज्यावेळी न्यायालयानं निकाल दिला, त्यावेळी कुठलंही नोटिफिकेशन या निवडणुकीचं निघालं नव्हतं. त्यामुळे न्यायालयानं याचा विचार करावा. राज्य सरकारनं जो निर्णय घेतला आहे. त्यानुसार, 92 नगर परिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचं आरक्षण लागू होणार आहे. मग यात ओबीसी आरक्षण लागू होणार नसेल तर हा एक प्रकारे अन्याय आणि विरोधाभास ठरेल, असं सरकारनं म्हटलं होतं.

काय आहे नेमकं प्रकरण?

राज्य निवडणूक आयोगानं 92 नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर केल्या होत्या. या नगरपरिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी सुरू होती. या 92 नगरपरिषदांमधील निवडणुका ओबीसी आरक्षणासह करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न सुरू होता. सर्वोच्च न्यायालयानं ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिला, त्यावेळी या संदर्भातली निवडणूक प्रक्रिया सुरू झाली होती. त्यामुळे आता तिथे ओबीसी आरक्षण लागू करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. राज्य निवडणूक आयोगानं 14 जुलै रोजी या 92 नगरपरिषदांच्या निवडणुका स्थगित केल्याची घोषणा केली होती. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Harshwardhan Patil Indapur : 2014 च्या पराभवाची खदखद इंदापूरकरांच्या मनातNarhari Zirwal Adiwasi MLA Protest : मुख्यमंत्री ऐकत नसतील तर प्लॅन बी तयार, झिरवाळ आक्रमकAdivasi MLA Protest Mantralaya : नरहरी झिरवाळ यांच्यासह आदिवासी आमदार आक्रमक, थेट जाळीवर उड्याKiran Lahamate On Aadiwasi MLa Protest : आम्ही रडणारे नाहीत लढणारे, सरकारने विचार करावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harshvardhan Patil: '...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
'...तो निर्णय सांगण्याचा अधिकार मला नाही', राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशाच्या मुहूर्तावर हर्षवर्धन पाटलांचं उत्तर
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
हाच का 30 वर्षांतला विकास; माढ्यात डिजिटल झळकले, राष्ट्रवादीचे आमदार लक्ष्य; अज्ञाताचा शोध सुरू
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
नरहरी झिरवाळांसह आदिवासी आमदारांच्या मंत्रालयातील संरक्षक जाळीवर उड्या, मोठा गदारोळ, नेमकं काय घडतंय?
Harshvardhan Patil : हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
हर्षवर्धन पाटलांची मोठी घोषणा, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात करणार प्रवेश 
Harshvardhan Patil: पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
पवारांना भेटण्याआधी फडणवीसांशी केली होती सविस्तर चर्चा; तुतारी फुंकण्याआधी हर्षवर्धन पाटलांनी सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
Sanjay Raut : 'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
'पुण्यातील घटना बदलापूरपेक्षा भयानक, फडणवीसांनी आता पोस्टरमधून बाहेर यावं', संजय राऊत कडाडले
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
मोठी बातमी : हर्षवर्धन पाटलांआधी अंकिता पाटलांनी भाजप सोडली, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित?
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
Embed widget