नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी दीर्घ झोपेतून जागे झाले, अभिजात भाषेच्या मुद्द्यावरून काँग्रेसची खोचक टीका
नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या सरकारने अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, असे जयराम रमेश म्हणाले.
नवी दिल्ली : अखेर मराठीला अभिजात भाषेचा (Marathi Classical Language) दर्जा मिळालाय. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारनं मोठा निर्णय घेतलाय. मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय. केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे जगभरातील मराठीप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेला प्रश्न महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचा निर्णय घेतल्यानंतर काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी मोदी सरकारला टोला लगावला आहे. नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या सरकारने अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला, अशी टीका जयराम रमेश यांनी केली आहे.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा, यासाठी जयराम रमेश यांनी आवाज उठवला आहे. त्यांनी यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) अनेक पोस्टही केल्या आहेत. त्या सर्व पोस्टचा संदर्भ देत जयराम रमेश यांनी पंतप्रधानांना आठवण करुन दिली आहे. जयराम रमेश म्हणाले, नॉन बायोलॉजिकल पंतप्रधानांच्या सरकारने अखेर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. आता याचा घटनाक्रम समजून घेऊया.
जयराम रमेश यांनी सांगितलेला घटनाक्रम
- 5 मे 2024 रोजी, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जुलै 2014 मध्ये केंद्र सरकारला सादर केलेल्या पठारे समितीच्या अहवालाची आम्ही नॉन- बायोलॉजिकल पंतप्रधानांची आठवण करून दिली.
- 12 मे 2024 रोजी, आणि महाराष्ट्रातील इतर नेत्यांनी संसदेत आणि संसदेच्या बाहेर प्रयत्न करूनही, या मागणीवर नॉन बायोलॉजिकल पंतप्रधान सरकारचे असलेले दीर्घ मौन आम्ही अधोरेखित केले.
- 13 मे 2024 रोजी आम्ही 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी INDIA गटाच्या महत्वाचा भाग म्हणून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे जाहीरपणे वचन दिले.
- 9 जुलै 2024 रोजी, आम्ही केंद्र सरकारच्या अभिजात भाषेच्या दर्जाच्या निकषांवर पुनर्विचार करण्याच्या संशयास्पद प्रयत्नांना उघडकीस आणले आणि मराठीला अशा दर्जाच्या मागणीवर त्याचा संभाव्य परिणाम ची जाणीव करून दिली
- 26 सप्टेंबर 2024 रोजी, ज्या दिवशी नॉन-बायोलॉजिकल पीएम पुण्याला भेट देणार होते, त्या दिवशी आम्ही त्यांना या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीची पुन्हा आठवण करून दिली.
- 3 ऑक्टोबर 2024 रोजी, आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या काही आठवड्यांपूर्वी, नॉन- बायोलॉजिकल पंतप्रधान शेवटी त्यांच्या दीर्घ झोपेतून जागे झाले. एवढा उशीर का झाला नॉन-बायोलॉजिकल प्रधानमंत्रीजी?
हे ही वाचा :