एक्स्प्लोर

पंकजा मुंडे, सदाभाऊ, मिलींद नार्वेकर ते प्रज्ञा सातव, विधानपरिषदेच्या नवनिर्वाचीत 11 आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न

विधानपरिषद निवडणुकीत (Vidhanparishad Electon) निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा (MLAs swearing ceremony) आज संपन्न झाला.

Legislative Council MLAs swearing ceremony : विधानपरिषद निवडणुकीत (Vidhanparishad Electon) निवडून आलेल्या नवनिर्वाचित सर्व 11 आमदारांचा शपथविधी सोहळा (MLAs swearing ceremony) आज संपन्न झाला. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Neelam Gorhe)  यांनी नवनिर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हेदेखील उपस्थित होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये महायुतीचे 9 उमेदवार विजयी झाले. तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार निवडणूक आले होते. तर शेकपाचे जयंत पाटील यांचा पराभव झाला होता.

शपथ घेणाऱ्या आमदारांची नावे  

1- पंकजा मुंडे - भाजप

2- योगेश टिळेकर - भाजप

3- अमित गोरखे - भाजप

4-  परिणय फुके - भाजप

5- सदाभाऊ खोत - भाजप

6- भावना गवळी - शिंदे शिवसेना 

7- कृपाल तुमाने  - शिंदे शिवसेना 

8- शिवाजी गर्जे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

9- राजेश विटेकर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

10- प्रज्ञा सातव - काँग्रेस 

11- मिलिंद नार्वेकर - उद्धव ठाकरे पक्ष

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान आणि मतमोजणी झाली होती

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान झाले होते. या निवडणुकीत महायुतीने 9 जागा जिंक्ल्या तर महाविकास आघाडीने 2 जागा जिंकल्या होत्या, 12 उमेदवारांपैकी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यात नेमका कोण विजयी होणार याची उत्कंठा लागून राहिली होती. अखेर, मिलिंद नार्वेकर यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली असून शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची 8 मतं फुटल्याचं प्रथमदर्शन दिसून येत आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या भाजप महायुतीचा वरचष्मा दिसून आला होता.  

काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा

विधानपरिषद निवडणुकीत सुरुवातीपासूनच काँग्रेसची मतं फुटणार, अशी चर्चा होती. या निवडणुकीत अजित पवार गटाला दोन उमेदवार निवडून आणणे कठीण होते. त्यासाठी त्यांना अतिरिक्त मतांची गरज होती. विधानपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाल्यावर शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर यांनी पहिल्या पसंतीची 23 मतं मिळवत विजय मिळवला. त्यामुळे काँग्रेसची 8 मतं फुटल्याची जोरदार चर्चा आहे.

भाजपचे तरुण चेहरे विधानपरिषदेत

भाजपची यंग ब्रिगेड विधानपरिषदेत दिसणार आहे. भाजपचे योगेश टिळेकर, परिणय फुके, पंकजा मुंडे आणि अमित गोरखे यांचा विजय झाला. अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत दिसणार आहे. तर योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला विधानपरिषदेत प्रतिनिधित्व मिळाले आहे. याशिवाय, सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार झाला आहे. 

 

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

JP Nadda On Mallikarjun Kharge : भाजप अध्यक्ष नड्डांचं मल्लिकार्जुन खरगेंच्या पत्राला प्रत्युत्तरSanjay Raut One Nation One Election : वन नेशन, वन इलेक्शनची घोषणा आश्चर्यकारक, राऊतांचं टीकस्त्रMVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
भरतशेठ गोगावलेंनी शिवलेल्या कोटाची घडी अखेर मोडणार, एसटी महामंडळाचं अध्यक्षपद मिळणार; सूत्रांची माहिती
Salman Khan Salim Khan :  लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? बुरखाधारी महिलेची सलीम खान यांना धमकी, पोलिसांचा तपास सुरू
Ganesh Visarjan 2024 : भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
भिवंडीत गणपती विसर्जन मिरवणुकीतील राड्यानंतर पहिली मोठी कारवाई, 'त्या' पोलीस अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली
Embed widget