एक्स्प्लोर
Coronavirus | आता ग्रामस्थांकडून गावातील सीमा बंद; बाहेरच्यांना नो एन्ट्री
कोरोना व्हायरसचा वाढता धोका म्हणून शहरवासीयांनी गावची वाट धरली आहे. मात्र, आता काही गावांनीही आपल्या सीमा बंद केल्या आहेत. त्यामुळे गावाकडे गेलेल्या लोकांना अडचणी येत आहेत.
मुंबई : कोरोना विषाणूचा वाढता धोका पाहता खबरदारीचा उपाय म्हणून अनेक शहरवासीयांनी गावाचा रस्ता धरला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांत गावात येणाऱ्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. मात्र, या लोकांमळे हा आजार आपल्या गावात पसरू शकतो या भीतीने काही गावांनी आपल्या सीमा बंद करुन घेतल्या आहेत. यापूर्वीच म्हणजे सोमवारी सरकारने राज्यात संचारबंदीसह जिल्ह्यातील सीमाही बंद केल्या आहेत. त्यामुळे अनेकजण जिल्ह्यात अकडून पडलेत. तर, गावकऱ्यांनीही सीमा बंद केल्याने गावातही जाताना अडचण येत आहे. दरम्यान, गावाकडे आलेल्या नागरिकांशी सौजन्यावे वागण्याचं आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर जनता कर्फ्यू पुकारण्यात आला. पण, त्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे सोमवारी दिसलेले चित्र हे चिंता वाढवणारे असेच होते. कारण, मोठ्या प्रमाणात नागरीक घराबाहेर पडले होते. बाईक, कार, रिक्षा यांची संख्या देखील रस्त्यावर मोठी होती. त्यामुळे रविवारी कमावलं के सोमवारी गमावलं असे हे चित्र होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा निर्णय घेतला. सोबतच जिल्ह्यातील सीमाही ऐकमेकांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. यातून अत्यावश्यक सेवा वगळ्यात आल्या आहेत.
Coronavirus | शहरातून आलेल्या नागरिकांशी गावकऱ्यांनी माणुसकीनं वागा; आरोग्यमंत्री राजेश टोपे याचं आवाहन
गावतही सीमाबंदी
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात असून कळमनुरी तालुक्यातील नांदापूरच्या गावकऱ्यांनी नवीन व्यक्तींना गावात नो एंन्ट्री केली आहे. याबाबतचा निर्णय सोमवारी गावकऱ्यांच्या बैठकीत झाला आहे. या प्रकारचा निर्णय घेणारे नांदापूर हे राज्यातील पहिलेच गाव आहे. राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खबरदारीच्या उपाय योजना हाती घेतल्या जात आहेत. घरा बाहेर न जाणे, सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे यासह इतर सुचना दिल्या जात आहेत. या शिवाय गर्दीची ठिकाणे टाळण्याच्या सुचनाही दिल्या जात आहेत.
वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही : WHO
कळमनुरी तालुक्यातील नांदापूर हे सुमारे 2 हजार 700 लोकसंख्येचे गाव आहे. गावात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांची आज सकाळी बैठक झाली. यावेळी सरपंच देवराव कऱ्हाळे, उपसरपंच संदीप बोरकर, यांच्यासह गावकऱ्यांची उपस्थिती होती. यावेळी कोरोनासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना सांगण्यात आल्या. त्यानंतर गावात नवीन व्यक्तींना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. गावातून बाहेरगावी जाणाऱ्या व्यक्तींना ग्रामपंचायतीच्या रजीस्टरला नोंद करुनच बाहेरगावी जायचे व परत आल्यानंतर त्याची नोंद करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच गावात प्रवेश करताना हात धुऊनच प्रवेश करण्याच्या सुचनाही देण्यात आल्या आहेत. कोरोनावर अशा प्रकारची खबरदारी करणे राज्यातील नांदापूर हे पहिलेच गाव आहे.
#CoronaEffect | अर्थमंत्री निर्मला सितारामण यांचा नागरिकांना मोठा दिलासा; आयकर भरण्याला मुदतवाढ
गावात येणारे सर्व रस्ते बंद
काही गावांमध्ये गावात येणारे सर्व रस्ते गावकऱ्यांनी बंद केलेत. केवळ एक मुख्य रस्ता सुरू ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी दोन गावकऱ्यांची नियुक्ती केली आहे. या ठिकाणी गावातील व्यक्ती बाहेरून आल्यानंतर त्यांचं नाव नोंदवलं जात आहे. तर इतर रस्त्यांवर काट्या टाकण्यात आल्या आहेत. गावातून पुणे, मुंबई या सारख्या शहरात कामासाठी गेलेले गावकरी गावाकडे येत आहेत. 14 मार्चपासून गावात आलेल्या या गावकऱ्यांची नोंद घेण्यात आली आहे. आतापर्यंत 25 गावकरी गावात परतले असून त्याची माहिती आरोग्य विभागाला देण्यात आली आहे. या गावकऱ्यांची आरोग्य विभागामार्फत तपासणी केली जात आहे.
गावाच्या सीमा काट्या टाकून सील
पालघर जिल्ह्यातील अनेक खेडेगाव व इतर गावांतील रस्ते बंद करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू झाल्यावर लोकांनी आपापल्या गावात बाहेरची लोक येऊ नयेत म्हणून गावाच्या वेशीवर मुख्य रस्तेच दगड काट्या टाकून बंद करायला सुरुवात केली आहे. बोईसर जवळील तारापूर नांदगाव हा रस्ताही गावकऱ्यांनी बंद केला आहे. जालना-जिल्ह्यातील गावकऱ्यांनीही बाहेरील लोकांना गावबंदी केलीय. यासाठी रस्त्यावर काटेरी कुंपण घातलंय. तर, कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन जालना जिल्ह्यातील उजैनपुरी आणि मेसखेडा गावच्या ग्रामस्थांनी बाहेरून येणाऱ्या वाहनांवर निर्बंध घालून, गावाबाहेरील येणाऱ्या लोकांना गावबंदी केलीय. गावात प्रवेश करणाऱ्या मुख्य रस्त्यावर काटेरी कुंपण आणि लाकडी गेट उभारून गावचा संपर्क तोडलाय.
Corona Awareness | काळजी घेतली नाही तर भारताचीही परिस्थिती जर्मनीसारखी होण्याची भीती, थेट जर्मनीहून राहुल वाघ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
महाराष्ट्र
विश्व
व्यापार-उद्योग
Advertisement