एक्स्प्लोर

नवनीत राणांच्या तक्रारीवरून राज्यातील चार अधिकाऱ्यांना नोटीस, लोकसभा सचिवालयात हजर राहण्याचे आदेश

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी हक्कभंग दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्त आणि महासंचालकांना ही नोटीस बजावण्यात आली आहे

Navneet Rana : खासदार नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून अमरावती पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस आयुक्त आणि पोलीस उपआयुक्त, अमरावती यांना 6 एप्रिल रोजी लोकसभा सचिवालयात हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलीस आयुक्तांच्या विरोधात हक्कभंग दाखल केल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे, अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि अमरावतीचे तत्कालीन पोलीस उपायुक्त शशिकांत सातव यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे.

प्रकरण काय आहे?

2020 मध्ये अमरावती जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे शेतीचं खूप नुकसान झालं त्यामुळे शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रति एकर नुकसान भरपाई आणि वीजबिल 50 टक्के माफ करावं यासाठी आमदार रवी राणांनी शेतकऱ्यांना घेऊन 13 नोव्हेंबर 2020 ला अमरावती-नागपूर महामार्ग मोझरी येथे तब्बल दोन तास रास्तारोको आंदोलन केले. यावेळी तिवसा येथे टायरची जाळपोळ केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. या आंदोलनामुळे आमदार रवी राणा यांच्यासह 18 शेतकऱ्यांना तिवसा पोलीसांनी अटक केली आणि न्यायालयाने 20 नोव्हेंबर 2020 पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. यावेळी आमदार रवी राणानी दिवाळी न्यायालयीन कोठडीत काढली.

तक्रारींवर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या

14 नोव्हेंबर 2020 दिवाळीच्या दिवशी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर महिलांना घेऊन ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर 15 नोव्हेंबर 2020 रोजी हे दोघेही शेतकऱ्यांना घेऊन मुख्यमंत्री यांच्या मातोश्रीवर जाऊन निवेदन देणार होते पण पोलिसांनी सायंकाळी त्यांना घरूनच ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले होते. यावेळी खासदार नवनीत राणा चांगल्याच संतापल्या होत्या आणि त्यांनी तेव्हाच सांगितले होते की, या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना संसदेत बोलावून यांच्यावर निलंबनाची कारवाई करायला लावणार. याचीच तक्रार खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष यांना 12 जानेवारी 2021 ला केली आणि त्या तक्रारींवर इतर चार खासदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत. (ज्यामध्ये भारती पवार आणि हिना गावित) यांचाही समावेश आहे आणि अखेर लोकसभा सचिवालय मधून 24 फेब्रुवारी 2022 ला उपसचिव यांनी 9 मार्च रोजी मुंबई पोलीस आयुक्त, अमरावती पोलीस आयुक्त डॉ आरती सिंग आणि तत्कालीन अमरावती पोलीस उपआयुक्त शशिकांत सातव यांना उपस्थित राहण्याची नोटीस बजावली आहे. आता 6 एप्रिल रोजी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे ज्यामध्ये आता पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांना देखील हजर राहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या

Navneet Rana : आमच्या डोक्यावर छत आहे, आम्हाला घरांची गरज नाही : नवनीत राणा

Navneet Rana : महाविकास आघाडीचे खासदार नाराज : नवनीत राणा ABP Majha

Amravati : राजापेठ पुलावर शिवरायांचा पुतळा उभारणार, अमरावती पालिका आमसभेत मिळाली मंजुरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaSanjay Raut : 'वर्षा'वरून गुंडांना मदत करण्याचे आदेश - संजय राऊतABP Majha Headlines :  10 AM : 9 नोव्हेंबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सPM Narendra Modi :राहुल गांधींकडून 15 मिनिटं सावरकरांची प्रशंसा करून दाखवावी ; उद्धव ठाकरेंना चॅलेंज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
योगा टीचरला विवस्त्र करत गळा दाबून पुरलं, पण श्वास रोखत मारेकऱ्याला अन् मृत्यूलाही चकवलं, खड्ड्यातून जिवंत बाहेर पडली अन् पोलिस स्टेशन गाठलं!
Vidhan Sabha Election 2024: निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
मोठी बातमी : निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्रात 280 कोटीचं घबाड पकडलं, आतापर्यंतच्या कुठे कुठे किती रोकड सापडली!
Income Tax Raid : माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
माजी मुख्यमंत्र्यांच्या पीएच्या संबंधित 17 ठिकाणी आयकर विभागाची एकाचवेळी धाड; ऐन निवडणुकीतील छापेमारीने राज्यात खळबळ
Satej Patil : कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
कोल्हापूरचा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की, करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटलं की करायचा; सतेज पाटलांचा हल्लाबोल
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
हिंगोलीत सुभाष वानखेडेंची ठाकरे गटातून हकालपट्टी, पक्षविरोधी कारवायांमुळे कारवाई
BJP Manifesto : भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
भाजपाचं ठरलं! अमित शाहांच्या हाताने जाहीरनामा करणार प्रसिद्ध; मविआच्या पंचसूत्रीनंतर BJP च्या पेटाऱ्यात नेमकं काय?
Maharashtra Assembly Elections 2024 : देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
देवळालीत नवा ट्विस्ट, सरोज अहिरे, योगेश घोलपांना निवडणूक आयोगाची नोटीस, नेमकं काय आहे कारण?
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
गंगापूर खुलाताबादचे उमेदवार प्रशांत बंब यांच्या सभेत मोठा गोंधळ; रेल्वेबाबत तरुणांनी प्रश्न विचारल्यामुळे गदारोळ
Embed widget