Rahul Gandhi on Somnath Suryawanshi : ... म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा गंभीर आरोप
बीड आणि परभणीतल्या घटनांनी गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र अशांत झालाय...दोन्ही ठिकाणी राजकीय भेटीगाठी वाढलेल्या असतानाच आज लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी परभणीला भेट दिली...कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांनी सांत्वन केलं... तसंच सूर्यवंशींच्या अंतयात्रेत हृदयविकाराच्या झटक्यामुळे मृत्यू झालेल्या विजय वाकोडे, यांच्या कुटुंबियांशीही त्यांनी संवाद साधला.. केवळ दलित असल्यानंच सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केल्याचा गंभीर आरोप त्यांनी भेटीनंतर केला...एवढंच नव्हे तर या घटनेसाठी त्यांनी संघाच्या विचारधारेला जबाबदार धरलंय...आणि सूर्यवंशींच्या हत्येप्रकरणी मुख्यमंत्री खोटं बोलल्याचा आरोपही त्यांनी केला..
परभणीत राहुल गांधींचा दौरा होत असताना, बीडच्या मस्साजोगमध्ये हत्या झालेले सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची आज, महायुतीच्या मंत्र्यांनी भेट घेतली.. त्यांचं सांत्वन केलं... सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, उद्योगमंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी यांनी ग्रामस्थांशी संवादही साधला... या भेटीवेळी देशमुखांच्या खऱ्या मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांनी मंत्र्यांकडे केली... त्याआधी शिरसाटांनी बीडचे नवे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्याशी चर्चा केली... बीडमध्ये दहशत पसरत असून, हे लोण दुसरीकडे पसरू नये म्हणून... आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे संजय शिरसाट म्हणाले...























