Kolhapur Lockdown | पुढील 15 दिवस कोल्हापूर जिल्ह्यात ‘नो एन्ट्री’
वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्हा पुढील 15 दिवस बाहेरच्या लोकांना बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी यासंबंधीचा आज आदेश काढला आहे.
कोल्हापूर : पुढील पंधरा दिवसात कोल्हापूर जिल्ह्यात इतर जिल्ह्यातील कोणालाही प्रवेश मिळणार नाही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलतराव देसाई यांनी यासंबंधीचा आज आदेश काढला आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी देण्यात येणारे ई-पासही त्यांनी बंद केले आहेत. जिल्ह्यात झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना संसर्गामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोल्हापुरात सोमवारपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी ही घोषणा केली. त्यानंतर आज कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी देखील महत्त्वाची घोषणा केली आहे. कोल्हापुरात येत्या सोमवारपासून म्हणजेच 20 जुलैपासून सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. यादरम्यान, सर्व नागरिकांनी या लॉकडाऊनमध्ये प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. लॉकडाऊन दरम्यान कोल्हापुरात फक्त औषध आणि दूध पुरवठाच सुरु राहील, इतर सर्व सेवा शंभर टक्के बंद राहणार आहेत.
व्हॉल्व असलेला एन-95 मास्क वापरणे सुरक्षित नाही?
कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. पण जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणं गरजेचं आहे, असं सतेज पाटील यांनी म्हटलं आहे.
राज्यात आज विक्रमी कोरोनारुग्णांची वाढ
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होणे दूर आधीपेक्षा झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यात आज एका दिवसातील सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आज 9 हजार 518 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 लाख 10 हजार 455 लाखांवर पोहोचली आहे. यापैकी 1 लाख 69 हजार 569 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर 1 लाख 28 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
Gatari Amavasya 2020 | कोल्हापुरात मटण, चिकन आणि मासे खरेदीसाठी गर्दी