एक्स्प्लोर
पार्किंग नियम मोडणाऱ्यांचे फोटो पाठवा, दंडाची अर्धी रक्कम मिळवा
तुम्ही नागपुरात पार्किंग नियमांचं उघड उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?' असा सवाल करत पार्किंगचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांची गडकरींनी चांगलीच कानउघडणी केली.
![पार्किंग नियम मोडणाऱ्यांचे फोटो पाठवा, दंडाची अर्धी रक्कम मिळवा Nitin Gadkari proposed to send photos of cars breaking parking laws to get half amount of fine latest update पार्किंग नियम मोडणाऱ्यांचे फोटो पाठवा, दंडाची अर्धी रक्कम मिळवा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/03/25152640/nitin-gadkari1.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नागपूर : पार्किंगचे नियम मोडणाऱ्यांचा फोटो पाठवा आणि दंडाची अर्धी रक्कम मिळवा, असा प्रस्ताव संसदेत मांडल्याची माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये दिली. या योजनेमुळे तरी नो पार्किंगमध्ये गाडी पार्क करणाऱ्यांना चाप बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सामान्य वाहनचालकच नाही, तर सरकारी अधिकारी आणि पोलिसही नागपुरात वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करताना 'एबीपी माझा' कॅमेरात कैद झाले आहेत.
'नागपुरात निवडणूक तुम्हाला लढवायची नाही, तर मी लढवणार आहे. तुम्ही नागपुरात पार्किंग नियमांचं उघड उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का करत नाही?' असा सवाल करत पार्किंगचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या अधिकाऱ्यांची गडकरींनी चांगलीच कानउघडणी केली.
नागपूर पोलिसांनी लॉ कॉलेजपासून शंकरनगरपर्यंत नो पार्किंग झोन जाहीर केला आहे. मात्र या भागात दिवसाच्या कुठल्याही वेळी वाहनं पार्क केलेली आढळतात. देशाच्या रस्ते वाहतुकीची जबाबदारी असलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना स्वतःच्या शहरातच पार्किंग नियमाचा बोजवारा उडताना दिसल्यामुळे पोलिसांची सार्वजनिकरित्या कानउघडणी करावी लागली.
नागपुरात सध्या अनेक नवे प्रकल्प राबवण्यात येत आहेत. मात्र नियोजनशून्य अंमलबजावणी आणि पोलिसांचं दुर्लक्ष यामुळे शहरात अपघातांची संख्या वाढली आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करण्याऱ्यांवर तातडीनं कारवाई करत जा अशी तंबीच गडकरींनी पोलिसांना दिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
मुंबई
भारत
व्यापार-उद्योग
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)